Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं 'त्या' व्हायरल व्हिडिओवर स्पष्टीकरण ; म्हणाले, "चुकीच्या पद्धतीने..."

विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला जात आहे
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं 'त्या' व्हायरल व्हिडिओवर स्पष्टीकरण ; म्हणाले, "चुकीच्या पद्धतीने..."

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडिओ सोशळ मीडियावर चांगचाल व्हायरल होतं आहे. यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला जात आहे. तसंच सर्वसामान्यांकडून देखील त्यांच्या या संवेदनशीलतेवर टीका केली जात आहे. या संदर्भातील वेगवेगळे मीम देकील व्हायरल होतं आहेत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर स्पष्टीकर दिलं आहे. त्यांनी 'एक्स'वर (ट्विटर) पोस्ट कर आपली भूमिका मांडली आहे.

मराठा आरक्षणाविषयक सर्वपक्षीय बैठकीनंतर सह्याद्री अतिथिगृह येथे पक्षकार परिषदेपूर्वी आपला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा माईकवरील संवाद 'सोशल मीडिया'वरुन चुकीच्या पद्धतीने संपादित करुन फिरविणे अत्यंत खोळसाळपणाचे असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत सरकार सुरुवातीपासून संवेदशीस असून कायद्याच्या चौकटीत बसेल असं आरक्षण देण्याबाबत सरकार प्राधान्याने काम करीत आहे. तसंच मराठा आरक्षणाबाबत पहिल्यांदाच अशा सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र बोलावून या विषयी त्यांचे एकमत घेण्यात आले आहे. असं ते म्हणाले. शासनाने इतकी चांगली भूमिका घेतली असतांना मुद्दामहून काही विरोधक खोडसाळपणे आणि व्हिडिओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करुन लोकांच्या मनात गैरसमज पसरवण्याचं काम करीत आहेत. हे अतिशय निंदनीय आहे. असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितलं आहे.

ते पुढे म्हणाले की, आमच्या एकमेकांमधील संवादाची मोडतोड करुन संपादित करुन दाखवून या घटकांनी जाणीवपूर्वक निंदनीय कृत्य केले आहे. शासन एकीकडे या संवेदनशील विषयावर ठोस भूमिका आमि निर्णय घेत आहे. अशा पार्श्वभूमीवर समाजात सोशल मीडियातून गैरसमज निर्माण करण्याचा कृत्याचा निषेध करावा तेवढा कमीच असल्याचं देखील शिंदे म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in