एकनाथ शिंदेंना कार्यकाळ पूर्ण करण्याचा विश्वास

"पुढील अडीच वर्षे हे सरकार नक्की चालणार, आमच्याकडे ५० आमदार आहेत. भाजपचे ११५ ते १२० जण आहेत. "
एकनाथ शिंदेंना कार्यकाळ पूर्ण करण्याचा विश्वास
ANI
Published on

एकनाथ शिंदेंनी शपथ घेतल्यावर दुसऱ्या दिवशी 'इंडिया टुडे' ला दिलेल्या मुलाखतीत हे सरकार अडीच वर्षाचा उर्वरित कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

एकनाथ शिंदे यांना मुलाखतीत "हे सरकार अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल असं वाटतं का?" असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर उत्तर देत शिंदे म्हणाले "पुढील अडीच वर्षे हे सरकार नक्की चालणार, आमच्याकडे ५० आमदार आहेत. भाजपचे ११५ ते १२० जण आहेत. आमच्याकडे एकूण १७० आमदार आहेत आणि ज्यांच्याकडे बहुमत असतं ते सरकार कार्यकाळ पूर्ण करतं. एक मजबूत सरकार राज्याला मिळाले आहे. हे सामान्य जनतेला हवे असणारे सरकार आहे ." पुढे ते म्हणाले ही भाजप व शिंदे गटाची नैसर्गिक युती आहे. आम्ही बाळासाहेबांचं हिंदुत्व,विकासाचा मुद्दा पुढे घेऊन चाललोय. जे प्रकल्प सुरु आहेत ते निर्धारित वेळेत पूर्ण करण्यावर आमचे लक्ष असेल. राज्यातील प्रत्येक घटकाला आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करू असे हे एकनाथ शिंदे म्हणाले.

आमदारांना अडीच वर्षात जे अनुभव आले ते बघता त्यांनी एक नवीन मार्ग निवडला. प्रत्येकाला आपल्या मतदारसंघामध्ये विकास करायचा आहे. मात्र त्यांना ते करता येत नव्हते. सरकारमध्ये असून काम करता येत नव्हते त्यामुळेच ते बाहेर पडले असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

पत्रकार परिषदेत शिंदेंना "काँग्रेसचं म्हणणं आहे की हे ईडीचे म्हणजेच एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आहे" यावर प्रश्न विचारला त्यावर प्रतिक्रिया देत यावर मी काहीही बोलू इच्छित नाही. असे व्यक्तव्य त्यांनी केले.

logo
marathi.freepressjournal.in