देशातील पाच राज्यात निवडणुकांच्या महासंग्रामाला सुरुवात झाली आहे. देशातील राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड व तेलंगणा या चार राज्यातील निवडणुकांत भारपला पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेना शिंदे गटाने घेतला आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी शुक्रवार रोजी याबाबतची माहिती दिली आहे.
राष्टीय लोकशाही आघाडीतील (NDA) शिवसेना सर्वात जुना आणि महत्वाचा घटक पक्ष आहे. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकांत भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. दरम्यान, या चार राज्यातील निवडणुकांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपला फक्त पाठिंबाच दिला नसून ते प्रचार देकील सामील होणार आहेत. पाठिंबा देण्याबाबतचं पत्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांना देण्यात आल्याचं राहुल शेवाळे यांनी सांगितलं.
राजस्थान विधानसभेत लाल डायरी झळकविणारे राजेंद्र गुढा यांना शिवसेनेने उदयपूरवाटीतून उमेदवारी दिली आहे. मात्र, त्यांनी तेथील भाजप उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. याबाबत विचारलं असता दोन्ही पक्षाचे नेते याबाबत मार्ग काढतील, असं खासदार राहुल शेवाळे म्हणाले.