शिवसेना ठाकरे गटाने समाजवादी पक्षासोबत आघाडी करण्याबाबत पावले टाकली आहेत. यावर शिवसेना आणि भाजपकडून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात आहे. आगामी काळात उद्धव ठाकरे जर औवैसी यांच्या पक्षाशी हातमिळवणी केली तरी आश्यर्य वाटू नये. त्यांच्या पक्षाने मूल्यांपेक्षा पैशालाच अधिक प्राधान्य दिल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजवादी पक्षांसोबत युती करण्याच्या उद्धव ठाकरेंच्या प्रयत्नांवर उघडपणे टीका केली आहे. असा युतींना मदारांचा विश्वासघात असल्याचं म्हणत शिंदे यांनी चिंता व्यक्त केली आहे. आगामी काळात ते शिवसेना(UBT)आणि AIMIM यांच्यात युती होण्याची शक्यता वर्तवली आहे. शिंदे एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यानी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेने पक्षाच्या तत्वांपेक्षा पैशाला प्राधान्य दिल्याचा आरोप केला आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की, त्यांच्या पक्षाच्या बँक खात्यातून ५० कोटी रुपये मिळावेत अशी मागणी करण्यात आली आहे. यावरुनच दिसतंय की, पक्षाची आपुलकी त्यांच्या राजकीय ध्येयापेक्षा आर्थिक स्त्रोतांवर जास्त आहे.
एका बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यात जागावाटपावरुन धुसफुस सुरु असल्याची चर्चा आहे. शिंदे गटाने लोकसभेच्या २२ जागांवर दावा सांगितला आहे. तर दुसरीकडे भाजपने मिशन ४५ धोरण जाहीर केलं आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट देखील महायुतीत सामील झाल्याने जागावाटपावरुन तिढा निर्णा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.