"आयुष्यभर साहेबांसोबत!", बीडमधून आमदार संदीप क्षीरसागर यांचा एल्गार

संदीप क्षीरसागर म्हणाले की, लोकांनी मला प्रश्न विचारला, सत्ता की साहेब? त्यांचा प्रश्न संपायच्या आत मी...
"आयुष्यभर साहेबांसोबत!", बीडमधून आमदार संदीप क्षीरसागर यांचा एल्गार

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची बीड येथे सभा आहे. या सभेत त्यांच्या या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या सभेत बोलताना आमदार क्षीरसागर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसंच त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी शेवटपर्यंत शरद पवार साहेबांच्या पायाशी राहीन, अशी भावना व्यक्त केली.

संदीप क्षीरसागर म्हणाले की, लोकांनी मला प्रश्न विचारला, सत्ता की साहेब? त्यांचा प्रश्न संपायच्या आत मी उत्तर दिलं. मी विचार देखील केला नाही. मी शरद पवारांसोबत राहीन. त्यांच्या पाया पाशीच राहीन, असं क्षीरसारगर म्हणाले. सत्तेमधून आम्ही ठराविक आमदार बाहेर पडलो होतो. त्यावेळी काही आमदार म्हणाले. "आम्ही सत्तेत आहोत, आमच्याकडे मोदी आहेत, तुमच्याकडे काय आहे?" मी म्हणालो माझ्याकडे पवार साहेब आहेत. बीड आणि मराठवाड्याची जनता स्वाभिमानी आहे. कोणी इकडे किकडे गेलं तरी आयुष्यभर तुमच्या सोबत, तुमच्या विचारांसोबत जोडून राहणार, अशी भूमिका संदीप क्षीरसागर यांनी घेतली आहे.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शदर पवार यांनी नव्याने पक्षाची बांधणी करण्यासाठी कंबर कसली आहे. सुरुवातीला त्यांनी नाशिक जिल्ह्यावर आपलं लक्ष केंद्रीत करत मंत्री छगन भूजबळ यांच्या येवाल मतदार संघात सभा घेतली. यानंतर आता त्यांनी मराठवाड्यावर आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे. काल पवार औरंगाबाद येथे होते. तर आज त्यांची बीड येथे सभा पार पडत आहे. या सभेत ते काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.

logo
marathi.freepressjournal.in