
आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहीत पवार यांनी या सर्वांवर भाष्य केलं आहे. आज घेतलेल्या पत्रगकार परिषदेत त्यांनी भाजपवर कुटूंब फोडण्याचा आरोप केला आहे. यावेळी त्यांनी भाजपने योग्य पद्धतीने डाव खेळला असून असून बाळासाहेबांनी मराठी अस्मिता जपण्यासाठी काढलेला शिवसेना पक्ष भाजपने फोडला, असा आरोप रोहीत पवार यांनी केला. तसंच त्यांनी अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या बंडखोर नेत्यांना देखील अनेक खोचक सवाल केले.
यावेळी बोलताना रोहीत पवार यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपने आधी शिवसेना पक्ष फोडला आणि नंतर राष्ट्रवादी, आम्ही आमच्यात उत्तर-प्रतिउत्त देत आहोत. आणि तिकडे भाजपा एसीमध्ये बसून मज्जा पाहत आहे. अजित दादांना विलेन ठरवण्याचं काम चार पाच नेते करत आहेत. आणि आम्ही आमच्यात भाडतोय असं टीका रोहीत पवार यांनी केली. यावेळी विकासासाठी भाजपसोबत गेलो असं म्हणणाऱ्या राष्ट्रवादीच्या बंडखोर नेत्यांना रोहीत यांनी चांगलंच धारेवर धरलं. आम्ही विकासासाठी हा निर्णय घेतल्याचं भाजप सोबत गेलेले म्हणत आहेत. मग तुम्ही पदावर होता तेव्हा विकास केला नाही का? असा प्रश्न सामान्यांना पडत असल्याचं ते म्हणाले.
यावेळी त्यांनी मी माझ्या पक्षासोबत, आजोबांसोबत राहण्याची भूमिका घेतली. कुटूंब कुणी फोडले, पक्ष कुणी फोडला, हे सगळयांना माहिती आहे. भाजपने सत्तेसाठी दोन कुटूंब फोडले हे लोकांना पटलेले नाही. तसंत एकेकाळी भाजपविरोधात बोलणारे सत्तेसाठी त्यांच्यासोबत बसले आहेत, हे लोकांना पटणार नसून हे लोक पवार साहेबांसोबत असं करु शकतात, तर सामान्यांचे काय? असा सवाल प्रत्येकाला पडला असल्याचं रोहीत पवार म्हणाले.