कालच्या भेटीवर शरद पवार यांचं स्पष्टीकरण ; म्हणाले, "तुम्हाला काही..."

सांगोला येथे पत्रकारांनी शरद पवार यांना या भेटीबाबत विचारले असता त्यांनी पत्रकारांनाच चिमटा काढला. म्हणाले...
कालच्या भेटीवर शरद पवार यांचं स्पष्टीकरण ; म्हणाले, "तुम्हाला काही..."

काल (१२ ऑगस्ट) रोजी पुण्यात उद्याोगपीत चोरडिया यांच्या घरी शरद पवार आणि अजित पवार यांच्यात गुप्त बैठक पार पडली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील या भेटीला दुजोरा दिला. मात्र आता शरद पवारांना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी ही भेट गुप्त नसल्याचं सांगितलं आहे. यावेळी पवार यांनी पत्रकारांनाच चिमटा काढला.

आज शरद पवार हे सोलापूत जिल्हातील सांगोल्यात होते. यावेळी त्यांना माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मला माहिती नाही की तुम्हाला कितपत माहिती आहे. अजित पवार हे माझे पुतणे आहेत. कुटुंबातील व्यक्तीने वडीलमाणसाला भेटण्यात गैर काय? यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, आमच्यातील काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली हे खरं आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत जाणार नाही. इंडिया आघाडीची बैठक ३१ रोजी मुंबईतल्या हयात हॉटेलमध्ये पार पडणार आहे. या बैठकीला ३० ते ४० वेगवेगळ्या पक्षाचे लोक येणार आहेत.मी, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी ही बैठक आयोजित केली आ्हे. आम्हाला लोकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे, असं पवार म्हणाले.

यावेळी पवार तुमचे पुतणे आहेत तर भेट गुप्त का? असा थेट प्रश्न पवारांना पत्रकारांनी विचारला. यावर त्यांनी बैठक गुप्त नसल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, माझ्या किंवा कुणाच्या घरी भेट झाली तर वावगं काय? यावर पत्रकारांनी मनात संभ्रम निर्माण झाल्याचं सांगितलं. यावर पवार म्हणाले की, याचा अर्थ तुम्हाला काही काम नाही. त्यानंतर सर्वत्र एकच हशा पिकला. दरम्यान, काल पुण्यात झालेल्या तिन्ही नेत्यांच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेलं नाही.

logo
marathi.freepressjournal.in