त्यांना कोकणातून तडीपार केले, फडणवीस यांचा हल्लाबोल

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात आणि कोकणात मतदारांनी महायुतीच्या पदरात मतांचे दान भरभरून टाकले आहे. आम्ही महायुतीला तडीपार करू, असे काही जण म्हणत होते, त्यांना कोकणानेच ‘तडीपार’ केले, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
त्यांना कोकणातून तडीपार केले, फडणवीस यांचा हल्लाबोल
Published on

ठाणे : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात आणि कोकणात मतदारांनी महायुतीच्या पदरात मतांचे दान भरभरून टाकले आहे. आम्ही महायुतीला तडीपार करू, असे काही जण म्हणत होते, त्यांना कोकणानेच ‘तडीपार’ केले, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

ठाणे व कोकण विभागात पाच जागा या महायुतीच्या निवडून आल्या. यामध्ये एक भिवंडीची जागा आपली निवडून येऊ शकली नाही. आता भिवंडीची जागा का निवडून आली नाही, याची आपल्याला कल्पना आहे. जे मुंब्रा येथे घडले तेच भिवंडीत घडले. मात्र, हे चूक सुधारण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला.राज्यात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यात दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत असून कोकण पदवीधर आणि मुंबई पदवीधर तर नाशिक शिक्षक, मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी ही निवडणूक आहे. कोकण पदवीधर मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीचे निरंजन डावखरे हे उमेदवार आहेत.

ठाण्यात रविवारी निरंजन डावखरे यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला.

“लोकसभा निवडणुकीच्या पाठोपाठ कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे. मला विश्वास आहे की पुन्हा एकदा कोकणाचा आशीर्वाद हा आपल्या महायुतीला प्राप्त होईल. मी सर्वात आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानतो. त्यांनी या निवडणुकीत मनसेचे अभिजीत पानसे यांना उमेदवार म्हणून घोषित केले होते. त्यांनी त्यासाठी मेहनतही घेतली होती. मतदार नोंदणीही केली होती. मात्र, आम्ही राज ठाकरे यांना विनंती केली आणि निरंजन डावखरे हे या मतदारसंघातील विद्यामान आमदार आहेत. आपण महायुतीत एकत्र काम करत आहोत. आपण लोकसभेलाही चांगले काम केले. त्यामुळे तुम्ही जो उमेदावर घोषित केला, त्यांना थांबायला सांगावं आणि निरंजन डावखरे यांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती केल्यानंतर राज ठाकरे यांनी अभिजीत पानसे यांची उमेदवारी मागे घेतली. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in