अखेर ऋतुजा लटकेंचा राजीनामा पालिकेने स्विकारला, काय दिली प्रतिक्रिया

ऋतुजा लटके यांनी पालिका कार्यालयात जाऊन राजीनामा पत्र घेतले. राजीनामा स्विकारण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला
अखेर ऋतुजा लटकेंचा राजीनामा पालिकेने स्विकारला, काय दिली प्रतिक्रिया

अंधेरी पूर्व पोटनिवडणूक २०२२ च्या शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा अखेर स्वीकारला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर लटके यांचा राजीनामा पालिकेने स्वीकारला आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी लटके यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले होते. त्यानुसार मनपाने त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे. ऋतुजा लटके यांनी पालिका कार्यालयात जाऊन राजीनामा पत्र घेतले. राजीनामा स्विकारण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. छगन भुजबळ यांनी 1985 मध्ये याच चिन्हावर निवडणूक लढवली होती. मशाल चिन्ह आमच्यासाठी शुभ आहे असे मत लटके यांनी व्यक्त केले आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र त्या महापालिकेच्या सेवेत होत्या, त्यांनी ३ ऑक्टोबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र पालिकेने त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचे काय होणार याबाबत संभ्रम होता.

ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याबाबत स्पष्टीकरण देताना महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी हा राजीनामा ३० दिवसांत स्वीकारला जाईल, असे सांगितले होते, यावर ऋतुजा लटके यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in