मतमोजणीच्या वेळी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा, इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाची मागणी

लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जून रोजी जाहीर होणार असून त्यादिवशी सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे योग्य प्रकारे पालन केले जाईल असे पाहावे, अशी विनंती इंडिया आघाडीतील नेत्यांच्या एका शिष्टमंडळाने रविवारी निवडणूक आयोगाच्या पूर्ण पीठाकडे केली.
मतमोजणीच्या वेळी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा, इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाची मागणी

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जून रोजी जाहीर होणार असून त्यादिवशी सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे योग्य प्रकारे पालन केले जाईल असे पाहावे, अशी विनंती इंडिया आघाडीतील नेत्यांच्या एका शिष्टमंडळाने रविवारी निवडणूक आयोगाच्या पूर्ण पीठाकडे केली. ईव्हीएमचे निकाल जाहीर होण्यापूर्वी टपालाद्वारे करण्यात आलेले मतदान जाहीर करावे, अशी मागणीही शिष्टमंडळाने केली आहे.

सार्वत्रिक निवडणुकीत विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने आयोगाची ही तिसऱ्यांदा भेट घेतली. आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे योग्य प्रकारे पालन केले जावे, अशा सूचना अधिकाऱ्यांना द्याव्या, अशी मागणीही करण्यात आली. ईव्हीएम यंत्राची ने-आण सीसीटीव्ही कॅमेरे असलेल्या मार्गिकेतूनच केली जावी, ईव्हीएम यंत्रं सील केले त्यावेळीच्या पावत्या पडताळणीसाठी निवडणूक प्रतिनिधींना दाखविण्यात याव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे, असे माकपचे सरचिटणीस सीताराम येच्युरी यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in