अंबाती रायडूची नवी इनिंग; उतरला राजकारणाच्या मैदानात, 'या' पक्षात केला प्रवेश; लोकसभा लढणार?

भारतीय संघाचा माजी स्टार क्रिकेटपटू अंबाती रायडू आता राजकारणाच्या मैदानात उतरला आहे.
अंबाती रायडूची नवी इनिंग; उतरला राजकारणाच्या मैदानात, 'या' पक्षात केला प्रवेश; लोकसभा लढणार?

भारतीय संघाचा माजी स्टार क्रिकेटपटू अंबाती रायडू आता राजकारणाच्या मैदानात उतरला आहे. रायडूने गुरूवारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या उपस्थितीत 'वायएसआर काँग्रेस' पक्षात प्रवेश केला.

आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री नारायण स्वामी आणि खासदार पेद्दिरेड्डी मिथुन रेड्डी यांच्यासह जगन मोहन रेड्डी यांनी रायडूचे पक्षात स्वागत केले. रायडूने यावर्षीच क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तो आयपीएल विजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा भाग होता. आयपीएलदरम्यानच त्याने निवृत्ती जाहीर केली होती. मात्र, त्यानंतर तो परदेशी लीगमध्ये खेळताना दिसला. रायडूच्या पक्षप्रवेशाचा व्हिडिओ देखील 'वायएसआर काँग्रेस' पक्षाने आपल्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर शेअर केला.

लोकसभा निवडणूक लढणार?

"लोकांच्या सेवेसाठी मी लवकरच आंध्र प्रदेशच्या राजकारणात प्रवेश करणार आहे. त्याआधी मी जिल्ह्याच्या विविध भागांना भेट देऊन लोकांच्या समस्या जाणून घेण्याचे ठरवले आहे," असे रायडूने जून महिन्यात मुतलुरू येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. त्यावेळी रायडू गुंटूर किंवा मछलीपट्टणम लोकसभा मतदारसंघातून 2024 ची लोकसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. मात्र रायडूने हे दावे फेटाळून लावले होते. तथापि, आता सर्व पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असताना रायडूने वाएसआर काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. अशा स्थितीत पक्ष रायडूला लोकसभा निवडणुकीचे तिकीट देणार का, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in