"गिरीश महाजन यांनी समाजाची दिशाभूल करू नये, अन्यथा.... "; मनोज जरांगेंचा थेट इशारा

मराठा आंदोलक मनोज जरांगे हे सध्या खान्देश दौऱ्यावर असताना त्यांनी गिरीश महाजन यांची चांगलीच शाळा घेतली
"गिरीश महाजन यांनी समाजाची दिशाभूल करू नये, अन्यथा.... "; मनोज जरांगेंचा थेट इशारा

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. अनेक जण यावर मत मतांतर मांडताना दिसत आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला राज्यातील संपूर्ण मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी केली आहे. दरम्यान, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं आता अशक्य आहे, ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत. त्या लोकांनाच प्रमाणपत्र दिलं जाईल, असं विधान राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे. गिरीश महाजनांच्या या वक्त्यव्यांवर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केलं आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे हे सध्या खान्देश दौऱ्यावर आहेत. यावेळी ते म्हणाले की, गिरीश महाजन यांनी बोलताना थोडा विचार करून बोलावं. त्यांनी आपली मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मागितला होता. त्यानंतर आपण त्यांना तो वेळ दिला देखील होता. आमच्याकडे त्यांनी दिलेल्या आश्वानाचें अनेक पुरावे आहेत. त्यांनी चुकीची वक्त्यव करून समाजाची दिशाभूल करू नये, अन्यथा, आम्ही त्याच्या आश्वानाच्या क्लिप संपूर्ण राज्यभर वायरल करू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील आणि खान्देशातील मराठे एकत्र येतं नाही, असं म्हटलं जायचं पण या सभेची गर्दी पाहून तुमच्या लक्षात येईल, असंही जरांगे यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी १७ डिसेंबरला आम्ही अंतरवली सराटी इथं बैठक घेणार आहोत. संपूर्ण राज्यभरातील मराठा आंदोलक या बैठकीला हजर राहणार आहे, असं देखील सांगितलं.

याशिवाय सरकारनं सांगितलं होत की, मराठा बांधवांवर गुन्हा दाखल होणार नाही, तरी तो गुन्हा दाखल झाला आणि त्यांना अटक देखील करण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी याकडे लक्ष घालावं गुन्हे दाखल करणं थांबवा, नाहीतर तुम्हाला महागात पडेल, असा इशारा देखील मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in