गिरीश महाजनांचे विधानसभा अध्यक्ष निवड प्रक्रियेला सुप्रीम कोर्टात आव्हान

गिरीश महाजनांचे विधानसभा अध्यक्ष निवड प्रक्रियेला सुप्रीम कोर्टात आव्हान

गिरीश महाजन

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

महाराष्ट्रातील विधानसभा निवडीचा वाद आता सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांनी यापूर्वी महाराष्ट्र सरकारने विधानसभा अध्यक्षांच्या निवडीमध्ये केलेल्या बदलांना विरोध करत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, उच्च न्यायालयाने गिरीश महाजन यांची याचिका फेटाळून लावली होती. गिरीश महाजन यांनी भरलेली १० लाख रुपयांची अनामत रक्कमदेखील जप्त करण्यात आली होती. आता गिरीश महाजन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीदेखील अद्याप विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी परवानगी दिलेली नाही. महाविकास आघाडी सरकारने ९ मार्चला विधानसभा अध्यक्ष निवडणूक घेण्याची तयारी केली होती. मात्र, राज्यपालांनी परवानगी दिली नाही.

मुंबई उच्च न्यायालयाच्या महाराष्ट्र सभापती निवडणूक नियमातील बदलाविरोधातील जनहित याचिका फेटाळण्याच्या आदेशाविरोधात भाजप आमदार गिरीश महाजन यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र, यावर सोमवारी सुनावणी होऊ शकली नाही. महाजन यांच्या वकिलांनी सोमवारी सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती ललित यांच्यापुढे ही याचिका यादीबद्ध करण्याची मागणी केली. यावर कोर्टाने मंगळवारी सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश रमणा यांच्यापुढे ही याचिका मांडण्यात यावी, अशी सूचना केली. नियमातील सुधारणा मनमानी आणि असंवैधानिक असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.