"आम्ही नरेंद्र मोदींची मान पकडून ठेवली आहे", लालू प्रसाद यादव यांचा मोदींवर निशाणा

इंडिया आघाडीची तिसरी बैठक ही मुंबईत बुधवारी आणि गुरुवारी पार पडणार असून या महत्वाच्या बैठकीसाठी देशातील प्रमुख विरोधी पक्षांचे नेते मुंबईत दाखल होत आहेत
"आम्ही नरेंद्र मोदींची मान पकडून ठेवली आहे", लालू प्रसाद यादव यांचा मोदींवर निशाणा

देशाती विरोधी पक्षांनी एकजूट करुन 'इंडिया' आघाडीची (INDIA alliance) निर्मीती केली आहे. आता इंडिया आघाडीची तिसरी बैठक ही मुंबईत(MUmbai) बुधवार आणि गुरुवारी पार पडणार आहे. या महत्वाच्या बैठकीसाठी देशातील प्रमुख विरोधी पक्षांचे नेते मुंबईत दाखल होत आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे(RJD) नेते लालूप्रसाद यादव(laluprasad yadav) हे देखील या बैठकीसाठी मुंबईत पोहचले आहेत. दरम्यान, लालू यादव यांनी मुंबईतील बैठकीला रवाना होण्यापूर्वी पाटणा येथे माध्यमप्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्या खास शैलीत मोदी सरकारवर आणि मुख्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला.

बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव(Tejasvi Yadav) यांच्यासोबत मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी लालू प्रसाद यादव म्हणाले की, आम्ही मुंबईत नरेंद्र मोदींच्या मानगुटीवर बसण्यासाठी निघालो आहोत. आम्ही त्यांची मान पकडून ठेवली आहे. आता त्यांना केंद्रातील सत्तेतून पाय उतार करायचं आहे, असा आक्रमक पवित्रा लालू प्रसाद यादव यांनी घेतला आहे.

लालू प्रसाद यांना त्यांच्या जुन्या अंदाजात पाहून त्यांच्या कार्यकर्त्यांना नवे बळ मिळेल, तसंच त्यांचा उत्साह वाढण्याची शक्यता वर्तलवली जात आहे. बुधवार आणि् गुरुवार या दोन दिवस मुंबईत देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या 'इंडिया' या आघाडीची बैठक पार पवडणार आहे. या बैठकीत काही महत्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. या बैठकीत घेतल्या जाणाऱ्या निर्णयांचा परिणाम देशाच्या राजकारणावर पडण्याची शक्यता असल्याचं बोललं जातं आहे. या दोन दिवसांच्या बैठकीत इंडिया आघाडीतील जागावाटप निवडणूक लढवण्याच्या फॉर्म्युल्यावर चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in