शरद पवारांवर टीका करताना गोपीचंद पडळखरांची जीभ पुन्हा घसरली ; म्हणाले, "एवढा माज..."

काही दिवसांपूर्वी त्यांनी अजित पवारांचा उल्लेख लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू असा केला होता. तसंच सुप्रिया सुळे यांना देखील लबाड लांडग्याची लेक म्हटलं होतं.
शरद पवारांवर टीका करताना गोपीचंद पडळखरांची जीभ पुन्हा घसरली ; म्हणाले, "एवढा माज..."

आपल्या वक्तव्यामुळे गोपीचंद पडळकर हे नेहमी चर्चेत असतात. ते सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया यांच्यावर टीका करत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी अजित पवारांचा उल्लेख लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू असा केला होता. तसंच सुप्रिया सुळे यांना देखील लबाड लांडग्याची लेक म्हटलं होतं. यानंतर आता पुन्हा एकदा गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली आहे. शरद पवारांना एवढा माज आणि मस्ती कुठून आली? असा सवाल पडळकरांनी केला. ते कोल्हापूरात बोलत होते.

धनगर आरक्षणावर मुद्दावर भाषण करताना गोपीचंद पडळकर म्हणालेस, "राज्यात आमची लोकसंख्या दोन कोटी असताना आम्हाला केवळ साडेतीन टक्के आरक्षण दिलं. मग आमच्या वाट्याला काय मिळालं? म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. या लबाड लांडग्यापासून सावध रहा. हा लबाड लांडगा आपल्या जातीत विष पेरण्याचं काम करतोय. जाती-जातींत भांडण लावण्याचं काम करतोय. मी तुम्हाला सांगतो तुम्ही सर्व एकत्र आलात तर या राज्य सरकारला धनगरांच्या आरक्षणाची अंमलबजावली करावीच लागेल. न्यायालयात जे व्हायचं ते होऊ द्या."

पडळकर पुढे बोलताना म्हणाले की, जेव्हा आपण चौंडीमध्ये जयंती साजरी करायचो तेव्हा तिथे कधीही राजकारण होत नव्हतं. पण गेल्यावर्षी ८३ वर्षाचे शरद पवार चौंडीत आले होते. त्यापूर्वी ८३ वर्षात हा बहाद्दर एकदाही चौंडीत आला नाही. असा हल्लाबोल त्यांनी केला.

logo
marathi.freepressjournal.in