हरयाणा भाजप सरकार अल्पमतात? अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढला!

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच हरयाणातील सत्तारूढ भाजपला मंगळवारी जोरदार धक्का बसला. हरयाणातील तीन अपक्ष आमदारांनी मुख्यमंत्री नायबसिंह सैनी सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याचे जाहीर केले.
हरयाणा भाजप सरकार अल्पमतात? अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढला!

चंदिगड : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच हरयाणातील सत्तारूढ भाजपला मंगळवारी जोरदार धक्का बसला. हरयाणातील तीन अपक्ष आमदारांनी मुख्यमंत्री नायबसिंह सैनी सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याचे जाहीर केले.

नायबसिंह सैनी सरकार आता अल्पमतात गेल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राज्यातील काँग्रेसचे प्रमुख उदय भान यांनी केली आहे. या अपक्ष आमदारांची नावे सोमबीर संगवान, रणधीर गोल्लन आणि धर्मपाल गोंडर अशी असून त्यांनी निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा देणार असल्याचेही जाहीर केले आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नासह अन्य प्रश्नांबाबत सारासार विचार करून आम्ही वरील निर्णय घेतल्याचे या अपक्ष आमदारांनी एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. दरम्यान, सरकार अल्पमतात आल्यानंतरही हरयाणातील नायब सिंह सरकारला धोका नसल्याचे बोलले जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in