ह्युंदाई पुण्यात ७ हजार कोटींची गुंतवणूक करणार-फडणवीस

दक्षिण कोरियाची मोटार वाहन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ह्युंदाईने पुण्यात ७ हजार कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
ह्युंदाई पुण्यात ७ हजार कोटींची गुंतवणूक करणार-फडणवीस

मुंबई : दक्षिण कोरियाची मोटार वाहन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ह्युंदाईने पुण्यात ७ हजार कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

फडणवीस यांनी ह्युंदाई मोटार इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी किम उनसू यांच्यासह कंपनीचे कार्यकारी संचालक जे. डब्ल्यू. रयू यांची भेट घेतली. त्यांनी मला ह्युंदाई मोटार इंडियाच्या माध्यमातून पुण्यातील तळेगाव येथे ७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होत असल्याची माहिती दिली. या चर्चेत ह्युंदाईच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुण्यातील प्रकल्पाच्या अनुषंगाने विविध पैलूंवर सल्ला आणि सहाय्य मागितले. संबंधित प्रकल्पाची सुयोग्य अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी आमच्या सरकारच्यावतीने संपूर्ण सहकार्य व पाठिंबा देण्याचे आश्वासन दिल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. हुंडाईची गेल्या २५ वर्षांपासून तामिळनाडूत मोठी गुंतवणूक आणि उद्योग आहे. मात्र, तामिळनाडूबाहेरील ही त्यांची पहिलीच गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रातील पुण्यात होत आहे. पुण्यातील या प्रकल्पासंदर्भाने महाराष्ट्र शासनासोबत सामंजस्य करार करण्यासाठी ते पुढील आठवड्यात दावोसला भेट देत आहेत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महाराष्ट्र होत असलेल्या हुंडाईच्या या प्रकल्पाचा आम्हाला आनंद असून त्यांनी वर्ल्ड क्लास ऑटोमोबाईल हब उभारावे, यासाठी त्यांचे स्वागत करतो, असेही फडणवीसांनी म्हटले.

दरम्यान, पुण्यात मोठं ऑटोमोबाईल हब असून टाटाचे अनेक प्रकल्प आहेत. त्यातच, आता हुंडाईचा प्रकल्प उभारण्यात येत असल्याने पुण्यात आणखी रोजगार निर्माण होईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in