संजय राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर देऊन मी स्वत:ची गरिमा कमी करु इच्छित नाही - राहुल नार्वेकर

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांवर घणाघातील टीका केली होती
संजय राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर देऊन मी स्वत:ची गरिमा कमी करु इच्छित नाही - राहुल नार्वेकर

शिवसेना-राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. मागील सुनावणीत विधानसभा अध्यक्षांच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढत नाराजी व्यक्त केली होती. यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांवर घणाघातील टीका केली होती. याला राहुल नार्वेकर यांनी प्रत्युत्तर देत संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

हे सरकार संविधानविरोधी, बेकायदेशीर आहे. चोर, लफंगे सराकर चालवतायेत आणि त्यांना घटनात्मक पदावर बसलेली व्यक्ती संरक्षण देत असेल तर या देशात आणि राज्यात काय चाललंय याची कल्पना न केलेली बरी. वारंवार राहुल नार्वेकर विधानसभेचे अधिकारी, विधिमंडळाचे सार्वभौमत्व हे सांगताय, याचा अर्थ असा नाही की चोरी करुन एखाद्याने दुसऱ्याच्या घरात शिरावं आणि त्या घरातील मालकाने त्या चोराला, खून्याला संरक्षण द्यावं, अशी सार्वभौमत्वाची व्याख्या होत नाही.

शिवसेनेचे ४० आमदार आणि राष्ट्रवादीचेही तेवढेत आमदार हे मूळ घरातील चोरी, लूट करुन गेलेत. त्या चोरांना दरोडेखोरांना विधानसभेचे अध्यक्ष सार्वभौमत्वाच्या नावावर संरक्षण देत असतील तर राहुल नार्वेकर नाव विधानसभा अध्यक्ष म्हणून या देशाच्या आणि राज्याच्या काळ्याकुट्ट इतिहासात नोंदवले जाईल. असा घाणाघात संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांवर केला होता. त्यारा राहुल नार्वेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना नार्वेकर म्हणाले की, बिनबुडाचे आरोप ते केवळ आणि केवळ निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकावा आणि आपल्याला हवं तसं घडवून घ्यावे, या हेतूने केले जातात. संजय राऊत यांना स्वस्त प्रसिद्धी प्राप्त करण्याची जुनी सवय आहे, असं मला वाटते. त्यामुळे अशा प्रवृत्ती उत्तर देऊन प्रोत्साहन न देणे हा सर्वात उत्तम उपायआहे. अशा व्यक्तींबद्दल आपण का बोलावं? आणि त्यांना महत्व का द्यावं? संजय राऊत म्हणजे, काय सुप्रीय कोर्ट आहेत का? संजय राऊत म्हणजे काय प्रेसिडेंट ऑफ इंडिया आहेत का? नाही. त्यामुळे आपण त्यांनी दिलेल्या वक्तव्याकडे लक्ष का द्यावं.

संजय राऊत यांना विधिमंडळाचे वक्तव्य समजले असते तर त्यांनी असे वक्तव्य केले नसले. अध्यक्षांचे अधिकार आमि जबाबदाऱ्यांची त्यांना माहिती असती, तर असं वक्तव्य केलं नसतं. संजय राऊत यांच्या प्रश्नाला किंवा आरोपांना उत्तर देऊन मी स्वत:ताची गरिमा कमी करु इच्छित नाही, असं पलटवार राहुल नार्वेकर यांनी केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in