"भीक मागण्यापेक्षा मी मरणं पसंत करेन" नवीन मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर शिवराज यांचं मोठं वक्तव्य

लाडके 'भैय्या' मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री न झाल्यामुळे अनेक महिलांमध्ये नाराजी
"भीक मागण्यापेक्षा मी मरणं पसंत करेन"

नवीन मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर शिवराज यांचं मोठं वक्तव्य

भोपाळ (मध्य प्रदेश): मोहन यादव यांची मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याच्या एका दिवसानंतरच कार्यवाहक मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी "कशाची भीक मागण्यापेक्षा मी मरणे पसंत करेन" असे वक्तव्य केले आहे.

मंगळवारी पत्रकार परिषदेत पत्रकारांनी भविष्यात दिल्लीत जाण्याबाबतचा प्रश्न विचारल्यावर, 'मैं मांगने से बेहतर मरना पसंद करूंगा', असे शिवराज म्हणाले. या वक्तव्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले शिवराज यांच्यात मतभेद असल्याच्या अफवांना उधाण आले आहे.

पत्रकार परिषदेनंतर लगेचच चौहान काही महिलांना भेटले. शिवराज यांची मुख्यमंत्रीपदी निवड न झाल्याने या महिला भुवक झाल्या होत्या. शिवराज यांनी या महिलांचे मिठी मारुन सांत्वन केले. महिलांनी रडत रडत शिवराज 'भैय्यां'ना सोडणार नाही असे सांगितले. त्यावर, मी तरी कुठे चाललोय, मी देखील सोडणार नाही असे चौहान म्हणाले. महिलांचा रडण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तथापि, मोहन यादव यांना माझा पूर्ण पाठिंबा असेल असे शिवराज यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यावरून, इंटरनेटवर 'एक्स' वापरकर्ते कमेंट सेक्शनमध्ये शिवराज यांना पक्षाचा सच्चा कार्यकर्ता म्हणून संबोधत आहेत.

उल्लेखनीय म्हणजे, शिवराज यांची मुख्यमंत्रीपदी निवड न झाल्यामुळे राज्यातील अनेक महिलांमध्ये नाराजी आहे. त्यांचे लाडके 'भैय्या' मध्य प्रदेशचे प्रमुख म्हणून काम करणार नाहीत याची त्यांना खंत आहे. त्यांच्यापैकी बर्‍याच जणींना पक्ष "लाडली बहना योजने" अंतर्गत आर्थिक मदत देणे बंद करेल अशी भीती आहे.

logo
marathi.freepressjournal.in