सर्व बाजूने विचार केला तर शिवसेनेचे १६ आमदार अपात्र ; नरहरी झिरवळांच्या विधानाने खळबळ

१६ आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय अंतिम टप्प्यात आला असताना झिरवळ यांनी केलेल्या वक्तव्याला महत्व
सर्व बाजूने विचार केला तर शिवसेनेचे १६ आमदार अपात्र ; नरहरी झिरवळांच्या विधानाने खळबळ

शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरी केलेल्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय निधानसभा अध्यक्ष घेतील असा निर्णय देशाच्या सर्वोच्च न्यायलयाने दिला होता. यानंतर या प्रकरणाचा व्यवस्थित अभ्यास करुन निर्णय दिला जाईल असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं होतं. सध्या या आमदारांच्या अपात्रतेबाबतची निर्णय प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. अशात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत बोलताना ते म्हणाले की, "सर्व बाजून विचार केला तर शिवसेनेचे ते १६ आमदार अपात्र ठरतील" असं वक्तव्य त्यांनी केलं. १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय अंतिम टप्प्यात आला असताना झिरवळ यांनी केलेले वक्तव्य महत्वाचं ठरत आहे.

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी केलेल्या वक्तव्यावे एकच खळबळ उडाली आहे. तसं त्यांनी १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय अंतिम टप्प्यात असताना हे वक्तव्य केल्याने त्यांच्या वक्तव्याला महत्व प्राप्त झालं आहे. सर्व बाजूने विचार केल्या तर शिवसेनेचे ते १६ आमदार अपात्र आहेत. पण शेवटी हा निर्णय अध्यक्षांकडे आहे. त्यांच्याकडे शेवटचे अधिकार आहेत. त्यामुळे मी त्यावर वक्तव्य करण उचित ठरणार नसल्याचं झिरवळ यांनी म्हटलं आहे. नरहरी झिरवळ यांनी केलेल्या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटाने त्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय प्रक्रिया तातडीने घेण्यात यावी सासाठी सर्वोच्च न्यायायलात याचिका दाखल केली होती. त्यानंतर त्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरात लवकर निर्णय होण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in