"संजय राऊत यांना चांद्रयानात बसवून नेलं असतं तर...", शहाजीबापू पाटील यांची बोचरी टीका

चांद्रयान-३ च्या यशस्वी लँडिंगवर बोलताना शहाजीबापू म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक चुक केली.
"संजय राऊत यांना चांद्रयानात बसवून नेलं असतं तर...", शहाजीबापू पाटील यांची बोचरी टीका

23 ऑगस्ट रोजी भारताच्या चांद्रयान -३ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करुन इतिहास रचला. यावर शिवसेना (शिंगे गट) आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली आहे. शहाजीबापू यांनी याबाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चुक झाल्याचं म्हटलं आहे. संजय राऊत यांना चांद्रयानात बसवून नेलं असतं तर महाराष्ट्रातील किरकिर गेली असती, अशी टिका शहाजीबापू पाटील यांनी केली.

चांद्रयान-३ च्या यशस्वी लँडिंगवर बोलताना शहाजीबापू म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक चुक केली. संजय राऊत यांना चांद्रयानात बसवून नेलं असतं, तर महाराष्ट्राची किरकिर गेली असती. एवढं पंतप्रधान मोदींना सांगयला हवं होतं. संजय राऊत यांना यानात बसवून वर घेऊन जावा. महाराष्ट्र निवांत राहतो." अशी बोचरी टीका शहाजी बापूपाटील यांनी केली.

दरम्यान, संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयाबाबत वेळकाढूपणा करत असल्याची टीका केली होती. "त्यांच्याकडे अजूनही वेळ गोठवण्याची जादू नाही आली. देशात कायदा आणि न्यायालय. अध्यक्षपदावर बसलेल्या व्यक्तीने समजून घेतलं पाहिजे की, आपण कायद्याचे रक्षक आहोत. संविधानाप्रमाणे काम न करणाऱ्यांना जनता कचऱ्याप्रमाणे फेकून देते", असा निशाणा राऊत यांनी साधला होता.

यावेळी 'इंडिया' आघाडी २०२४ची लोकसभा जिंकणार आहे. देशाचं संविधान कायदा आणि लोकतंत्र वाचवण्याची ही लढाई आहे. 'इंडिया' आघाडीच्या बैठकीत काही नवीन पक्षही येऊ शकतात, असा सुचक इशारा संजय राऊत यांनी दिला होता.

logo
marathi.freepressjournal.in