सत्ता आल्यास मोहन भागवत आणि नरेंद्र मोदींना तुरुंगात पाठवू - प्रकाश आंबेडकर

मोहन भागवतांचं भाषण म्हणजे चोराच्या मनातील चांदणं असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
सत्ता आल्यास  मोहन भागवत आणि नरेंद्र मोदींना तुरुंगात पाठवू - प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोहन भागवतांचं भाषण म्हणजे चोरांच्या मनातील चांदणं असं म्हटलं आहे. आपल्या हातात सत्ता आल्यास आपरण नरेंद्र मोदी आणि मोहन भागवतांना जेलमध्ये टाकू असं वक्तव्य देखील प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. ते आकोला येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आज विजयादशमीच्या उत्सवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी संघाच्या विजयादशमी उस्तवात मुख्य भाषण केलं. यावेळी बोलताना मोहन भागवत यांनी आगामी लोकसभा निवडणूक लोकांना भडकवून मत घेतली जातील, अशी शक्यता वर्तवली आहे. भागवतांच्या याच भाषणावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीका केली आहे. मोहन भागवतांचे भाषण म्हणजे चोराच्या मनातील चांदणं असल्याची टीका असल्याचं ते म्हणाले आहेत.

तर आपल्या हातात सत्ता आली तर आपण मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांना तुरुंगात पाठवू असं देखील ते म्हणाले. यावेळी त्यांनी रावणदहनाची प्रथान थांबवण्यासाठी संघ आणि हिंदूत्ववादी संघटनांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन देखील त्यांनी केलं.

मोहन भागवत यांच्यावर टीका करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "लोकांची मने खराब करणारे तेच आहेत. त्यांनी मणिपूरमध्ये तेच केलं. मुसलमानांच्या संदर्भात तेचं केलं. औरंगचेबाचं स्टेटस ठेवल्यानंतर कारवाई करणारे तेच आहेत. दंगा माजवणारं आरएसएसच आहे. त्यामुळे त्यांनी लोकांना आधीच सांगितलं की आम्ही दंगली माजवून मते घेणार आहोत. संघ आणि भाजप एकचं! मोहन भागवत म्हणजेच मोदी आणि मोदी म्हणजेच मोहन भागवत. सत्तेत आल्यानंतर बेकायदेशीर शस्त्रपूजन करणाऱ्या नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांना तुरुंगात पाठवू."

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in