"मोदी सोडले तर तुमच्याकडे कोण?", उद्धव ठाकरे यांचा सत्ताधारी पक्षाला सवाल

'I-N-D-I-A Alliance' ची बैठक मुंबईत पार पडत आहे. या बैठकीपूर्वी महाविकास आघाडीद्वारा आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते.
"मोदी सोडले तर तुमच्याकडे कोण?", उद्धव ठाकरे यांचा सत्ताधारी पक्षाला सवाल

केंद्रातील सत्ताधारी पक्षाकडून नेहमी विरोधकांकडे पंतप्रधान पदाचा चेहताच नाही अशी टीका नेहमी केली जाते. सत्ताधाऱ्यांच्या एनडीए आघाडीला राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रस्तुत्तर दिलं आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी तुम्ही इंडिया आघाडीचीकाळजी करु नका. आमच्याकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे आहेत, भाजपकडे नरेंद्र मोदी वगळता कोणता चेहरा आहे? असा थेट सवाल केला आहे. उद्या 'I-N-D-I-A Alliance' ची बैठक मुंबईत पार पडत आहे. या बैठकीपूर्वी महाविकास आघाडीद्वारा आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते.

या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षाविरोधात जोरदार फटकेबाजी केली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर आणि आमची युती झालेली आहे. आम्ही ती जाहीर केलेली आहे. त्यामुळे त्याचा काही प्रश्न नाही. मात्र, त्यांची जर इच्छा असेल ती त्यांनी तशी व्यक्त केल्यास त्यांच्या वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये सामावून घेण्यासाठी विचार केला जाईल, असं ते म्हणाले.

आमच्यासोबत असणाऱ्यांवर पण टीका करतो

उद्धव ठाकेर यांची शिवसेना महाविकास आघाडीत आणि इंडिया आघाडीत असून देखील दैनिक सामनातून शरद पवार आणि अजित पवारांसह राष्ट्र्वादी काँग्रेस पक्षावर टीका कशी केली जाते? असा सवाल पत्रकारांनी उपस्थित केल्यावर उद्धव ठाकरे यांनी मोठ्या शिताफिने याप्रश्नाला उत्तर दिलं. ते म्हणाले की, "01आम्ही ज्यांच्या सोबत असतो त्यांच्यावर टीका करतो." उद्धव ठाकरे यांच्या टीकेनंतर पत्रकार परिषदेतील वातावरण आणखी खेळी मेळीचे बनले.

यावेळी पत्रारांनी उद्धव ठाकरे यांनी कोंडीत पकडण्यासाठी परत शिवसेनेच्या नेत्यांकडून उद्धव ठाकरे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील असा दावा केला जात असल्याचा प्रश्न केला गेला. यावर देखील उद्धव ठाकरे यांनी मिश्किलपणे उत्तर दिलं. ते म्हणाले, "ठिक आहे..आता उद्याच जातो आणि शपथ घेतो",

उद्याचं जातो आणि...

दरम्यान, देशातील प्रमुख विरोधी पक्ष एकत्र आलेल्या 'I-N-D-I-A Alliance'ची उद्या मुंबईत बैठक पार पडत आहे. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकांविषयी रणनिती ठरवण्यात येणार असल्याची शक्यता आहे. तसंच या बैठकीत जागा वाटप आणि पंतप्रधान पदाचा उमेदवार देखील निश्चित केला जाऊ शकतो, असं सांगण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in