ईडीच्या कारवाईमध्ये आप मंत्र्याच्या घरी सापडली २.८२ कोटी रोकड आणि १३३ सोन्याची नाणी

केंद्रीय तपास यंत्रणेने ३० मे रोजी सत्येंद्र जैन यांना अटक केल्यानंतर काही दिवसांनी हे पाऊल उचलण्यात आले आहे. सत्येंद्र जैन यांना ९ जूनपर्यंत ईडीच्या कोठडीतच मुक्काम
ED Action
ED ActionANI
Published on

ईडीने (ED) केलेल्या कारवाईमध्ये दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन (Delhi Health Minister Satyendar Jain) यांच्या निवासस्थानावर कोलकाता येथील एका कंपनीच्या हवाला व्यवहार प्रकरणी छापा टाकला. या छापेमारीमध्ये जवळपास २.८२ कोटी रोकड आणि मोठ्या प्रमाणात सोने जप्त करण्यात आले आहे. छापेमारीत कॅश आणि १३३ सोन्याचे सिक्के सापडल्याचे वृत्त समोर येत आहे. दरम्यान केंद्रीय तपास यंत्रणेने ३० मे रोजी सत्येंद्र जैन यांना अटक केल्यानंतर काही दिवसांनी हे पाऊल उचलण्यात आले आहे. सत्येंद्र जैन यांना ९ जूनपर्यंत ईडीच्या कोठडीतच मुक्काम करावा लागणार आहे.

आयपीसीच्या विविध कलमांतर्गत आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांतर्गत केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने जैन आणि इतरांविरुद्ध मनी लाँड्रिंगची चौकशी सुरू केली होती. ईडीने अलीकडेच अकिंचन डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, इंडो मेटल इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड, प्रयास इन्फो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, मंगलायतन प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, जेजे आयडियल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड, स्वाती जैन आणि सुशीला जैन यांच्या ४.८१ कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्ता तात्पुरत्या जप्त केल्या आहेत.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी थेट केंद्र सरकारवर निशाणा साधला. सत्येंद्र जैन यांच्याविरोधातील प्रकरण पूर्णपणे फेक असून राजकीय हेतुने प्रेरित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ANI
logo
marathi.freepressjournal.in