इंडिया आघाडीने केली समन्वय समितीची स्थापना ; महाराष्ट्रातील 'या' दोन नेत्यांचा समावेश

इंडिया आघाडीला पुढे नेण्यासाठी 13 जणांच्या समितीची स्थापना करण्यात आली आहे.
इंडिया आघाडीने केली समन्वय समितीची स्थापना ; महाराष्ट्रातील 'या' दोन नेत्यांचा समावेश

आज देशातल्या प्रमुख विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची मुंबईत तिसरी बैठक पार पडत आहे. आज या बैठकीचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. सध्या ही बैठक सुरु असून या बैठकीत समन्वय समितीची स्थापना करण्यात आली. या समन्वय समितीत १३ जणांचा समानेश करण्यात आला आहे. इंडिया आघाडीला पुढे नेण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसंच या बैठकीत महत्वाचे ठराव देखील मंजूर करण्यात आला आहे.

इंडिया आघाडीतील वरिष्ठ नेते समन्वय समितीच्या माहितीनुसार पुढील काम करणार आहे. या समितीचे सदस्य देशभर फिरणार असून पुढील अजेंडा ठरणार आहे. या समितीत महाराष्ट्रातून शरद पवार आणि संजय राऊत यांचा समावेश करण्यात आला आहे.

या समन्वय समितीत १३ जणांचा समावेश असणार आहे.

१) केसी वेणूगोपाल

२) शरद पवार

३) एम के स्टॅलिन

४) संजय राऊत

५) तेजस्वी यादव

६) अभिषेक बॅनर्जी

७) राघव चड्डा

८) जावेद खान

९) ललन सिंग

१०) हेमंत सोरेन

११) मेहबूबा मुफ्ती

१२) डी राजा

१३) ओमर अब्दुला

इंडिया आघाडीच्या या बैठकीत काही ठराव मंजूर करण्यात आले आहेत. यात 'जुडेगा भारत, जितेगा भारत', 'शक्य तिथे लोकसभा निवडणुका एकत्र लढणार', 'जागावाटपसंदर्भात लवकरात लवकर सुरुवात करुन प्रक्रिया पूर्ण करणार', 'येत्या काही दिवसांत एकत्र रॅलीला सुरुवात करणार' या ठरावांचा समावेश आहे. यासोबतचं इंडिया आघाडीत सोशल माध्यमांवर एकजूट दाखवणार असून त्यासाठी प्रवक्त्यांमध्ये समन्वयासाठी देखील एका विशेष समितीची स्थापना केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आज मुंबईतील ग्रॅण्ड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये इंडिया आघाडीची ही बैठक पार पडत असून याबैठकीचा आज दुसरा दिवस आहे. या बैठकीत इंडिया आघाडीचा अध्यक्ष कोण असावा आणि पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून कुणाला प्रोजेक्ट करावं, यावर चर्चा पार पडत असल्याचं सांगितलं जात आहे. तसंच या बैठकीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जून खर्गे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भाजप सूडबुद्धीने काम करत असून केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जात आहे. आपल्याला अटकेची तयारी करावी लागेल, असं वक्तव्य खरगे यांनी केलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in