आज मुंबईत इंडिया आघाडीची बैठक ; 'या' पाच मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता

या बैठकीत जवळपास 28 पक्षांचे 63 नेते सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आज मुंबईत इंडिया आघाडीची बैठक ; 'या' पाच मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता

आज(३१ ऑगस्ट) मुंबईत(Mumbai) विरोधकांच्या इंडिया आघाडीची(INDIA Allince)तिसरी बैठक पार पडणार आहे. या बैठकीत जवळपास 28 पक्षांचे 63 नेते सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसंच या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकांसंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार असल्याचं देखील बोललेलं जात आहे. बंगळुरू आणि पटना येथे पार पडलेल्या बैठकीनंतर इंडिया आघाडीची ही तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. या बैठकीत काय होईल याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलं आहे. देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येत या आघाडीची स्थापना केली. 'इंडिया' आघाडीची स्थापन झाल्यापासून आघाडीतील पक्षांच्या समन्वयाविषयी अनेक चर्चा झाल्या होत्या. यापूर्वी समन्वयक म्हणून नितीश कुमार यांची नियुक्ती होईल अशी चर्चा होत होती. मात्र, आता त्यांनी या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेतलाच म्हटलं जात आहे.

आजच्या बैठकीत या पाच मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचं म्हटलं जातं आहे.

१. समन्वय समितीमध्ये कोणकोणत्या पक्षाचे कोणते नेते असतील?

२. जागावाटपावर चर्चा पार पडून निर्णय घेतला जाण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

३. आजच्या बैठकीत 'इंडिया' आघाडीचा लोगो जारी केला जाईल व हा लोगो आघाडीच्या प्रचारात वापरला जाईल. (निवडणुका मात्र पक्ष आपापल्या चिन्हावर लढतील )

४. आघाडीला बहुमत मिळालं तर पंतप्रधानपदी कोण बसणार? याविषयी देखील चर्चा होण्याची शक्यता आहे

५. पंतप्रधान पदाच्या उमेदवाराची माळ नक्की कोणाच्या गळ्यात पडणार?

आज संध्याकाळी पार पडणाऱ्या या बैठकीत देशातील प्रमुख विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले आहेत. या बैठकीत अनेक महत्वाचे मुद्दे चर्चीले जाणार असून अनेक महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहे. संपूर्ण देशाचं लक्ष या विरोधी पक्षांच्या बैठकीकडे लागले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in