भारतीय राज्यघटनेत इंडिया आणि भारत ही दोन्ही नावे समाविष्ट आहेत. असं असताना देखील इंडिया नावावरुन आता नवा वाद उद्भवताना दिसत आहे. देशभरातील प्रमुख विरोधी पक्षांनी स्थापन केलेल्या 'INDIA' आघाडील शह देण्यासाठी भाजपच्या नेतृत्वातील सरकारने भारत नाव पुढे केल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरूर यांनी आता भारत(BHARAT)या अक्षरांवरुन विरोधकांच्या आघाडीचे नाव सुचवले आहे.
शशी थरुर यांनी 'एक्स'वर पोस्ट करत म्हटलं की, आम्ही आमच्या आघाडीला अलायन्स फॉर बेटरमंट, हार्मोनी अँड रिस्पॉन्सिबल अॅडव्हान्समेंट फॉर टुमारो (Betterment, Harmony And Responsible Advancement for Tomorrow (BHARAT) ) असं म्हणू शकतो. मग कदाचित सत्ताधारी पक्ष नावे बदलण्याचा हा खेळ थांबवतील असं थरुर यांनी म्हटलं आहे.
शशी थरुर यांनी या आधीदेखील भारत की इंडिया या वादावर आपलं मत व्यक्त केलं होतं. इंडिया या नावाचं एक मूल्य आहे. सरकार हे नाव बगळण्याचा मुर्खपणाचा निर्णय घेऊ शकत नाही, अशी अपेक्षा असल्याचं थरुन म्हणाले होते. यावेळी भारत या नावाला आपला आक्षेप नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. यावेळी बोलताना मल्ल्याळम आणि हिंदी भाषिक दैनिकांमध्ये भारत याच शब्दाचा वापर होतो. इंडिया आणि भारत ही दोन्ही नावं यापूढेही कायम ठेवावीत अशी अपेक्षा थरुर यांनी व्यक्त केली.