शिंदे गटातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर ; शेकडो कार्यकर्ते एकाच वेळी सोडणार पक्ष ?

शिंदे गटात सर्वकाही आलबेल नाहीय. मुंबईत शिंदे गटात देखील मोठी धुसफुस असल्याचं समोर आलं आहे.
शिंदे गटातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर ; शेकडो कार्यकर्ते एकाच वेळी सोडणार पक्ष ?

एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांना सोबत घेतल शिवसेनेला मोठ भगदाड पाडलं. यानंतर ठाकरे गटाला लागलेली गळती सुरुच आहे. शिंदे यांनी मुंबईवर लक्ष केंद्रीय करत मुंबईत शिवसेनाला भक्कम करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. असं असून देखील मुंबईत ठाकरे गटची ताकद जास्त आहे. गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे गटातून एक-एक नेता फुटून शिंदे गटात सामील होत आहे. त्यामुळे ठाकरे गट हळूहळू कमकुवत होत चालला आहे. याच वेळी शिंदे गटात सर्वकाही आलबेल नाहीय. मुंबईत शिंदे गटात देखील मोठी धुसफुस असल्याचं समोर आलं आहे.

गेल्या आठवड्यात कांदिवली, चारकोप, मालाडमधील पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याची माहिती समोर आली होती. या पदाधिकाऱ्यांनी सिद्धेश कदम यांच्याकडून पक्षात काम करु दिलं जात नसल्याचा आरोप केला होता. "आम्ही तुमच्यासोबत आहोत, पण कदमांना समज द्या", असं या पत्रात म्हटलं होतं. आता असाच प्रकार जोगेश्वरीमध्ये सुद्धा घडू शकतो. जोगेश्वरीतील नाराज शिवसैनिक राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. हे शिवसैनिक विभाग प्रमुख विजय धीवार यांच्या जाचाला कंटाळले आहेत.

धीवार यांच्या जाचाला कंटाळलेल्या शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहलं आहे. या पत्रात त्यांनी कारवाईची मागणी केली आहे. "एकनाथ शिंदे २४-२४ तास काम करतात. मी देखील त्यांच्यासारख स्वत:ला झोकून देऊन काम करतोय. पण माझ्या विरोधात कटकारस्थान रचलं जातयं. दोन महिने शाखा बंद आहे. तोंडी बोललो, लेखी निवेदन दिलं. त्यांनी काही हालचाल केली नाही. बाळासाहेब भवनला पत्र लिहलं, आता आम्ही सर्व सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीत आहोत" यामुळे याता शिवसेना शिंदे गटातील गटबाजी देखील चव्हाट्यावर आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in