"...हा कोणत्याही पक्षासाठी चांगला निर्णय ठरणार नाही", पंकजा मुंडेंचं वक्तव्य भाजपला इशारा तर नाही ना?

यावेळी बोलताना पंकजा यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी सहानुभूतीपूर्वक वक्तव्य केलं
"...हा कोणत्याही पक्षासाठी चांगला निर्णय ठरणार नाही", पंकजा मुंडेंचं वक्तव्य भाजपला इशारा तर नाही ना?
Published on

२०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट न देणे हा कोणत्याही राजकीय पक्षासाठी चांगला निर्णय ठरणार नसल्याचं मत भारतीय जनात पक्षाच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं आहे. त्या एका वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, "माझा पक्ष मला निवडणुकीत का उतरवणार नाही? माझ्यासारख्या उमेदवाराला तिकीट न देणे हा कोणत्याही पक्षासाठी चांगला निर्णय ठरणार नाही." त्यांनी असा निर्णय घेतल्यास त्यांना लोकांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. असं पंकजा म्हणाल्या.

परळी विधानसभा मतदारसंघातून २०१९ पंकजा यांचे बंधू आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पंकजा यांचा पराभव केला होता. या वेळी बोलताना आपण नवीन मतदारसंघ शोधत नसल्याचंही पंकजा म्हणाल्या. त्यांची बहिण लोकसभा सदस्या प्रीतम मुंडे यांची बदली होण्याची शक्यताही पंकजा यांनी फेटाळून लावली.

पंकजा मुंडे यांनी बुधवारी सांगितले की, 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना तिकीट न देणे हा कोणत्याही पक्षासाठी चांगला निर्णय ठरणार नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या त्यांच्याबद्दलच्या सहानुभूतीपूर्ण वक्तव्यावर पंकजा यांनी केलं. त्या म्हणाल्या की, 'कदाचित त्या अजूनही त्याच टप्प्यातून जात असतील ज्यातून मी 10-12 वर्षांपूर्वी गेली होती.' उल्लेखनीय म्हणजे, धनंजय मुंडे हे आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात आहेत, ज्यांनी शरद पवारांविरुद्ध बंड केले होते आणि शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करत आहेत.

यावेळी बोलतामा पंकजा मुंडे यांनी त्यांच्या कुटुंबाच्या नियंत्रणाखाली असलेल्या सहकारी साखर कारखान्याला जीएसटी विभागाकडून नोटीस मिळाली असल्याचीही पुष्टी केली आहे. त्या म्हणाल्या की, जीएसटी विभागाच्या ही घटना दोन-तीन महिन्यांपूर्वी ही घटना घडली होती, आताही घडली आहे. याला आम्ही सकारात्मक प्रतिसाद देत आहोत, असं पंकजा म्हणाल्या.

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी काढलेली यात्रा, तसंच सध्या त्या करत असलेली वक्तव्य या भाजपला इशारा तर नाहीत ना? याबाबत राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लढवले जात आहेत.

logo
marathi.freepressjournal.in