"...ती वेळ येऊच नये", पंकजा मुंडेचं 'ते' वक्तव्य भाजपा इशारा तर नाही ना?

पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाकडून नुकतीच कारवाई करण्यात आली आहे.
"...ती वेळ येऊच नये", पंकजा मुंडेचं 'ते' वक्तव्य भाजपा इशारा तर नाही ना?

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. गोपीनाथ मुंडेंपेक्षा जास्त संघर्षाची वेळ आपल्यावर आली आहे. माझ्याविरोधात कोणीही अफवा उठवू नये. ईश्वर न करो आयुष्यात मला काही निर्णय घेण्याची वेळ येवो. असा निर्णय घेणं हे खुपचं दु:खदायक असतं, अशा शब्दात पंकजा मुंडे यांना आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे.

पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाकडून नुकतीच कारवाई करण्यात आली. या पार्श्वभूमीवर त्यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना याबाबतचं विधान केलं आहे.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे ?

माझ्या विरोधात कोणीही अफवा उठवू नये. मला जेव्हा आयुष्यात काहीपण निर्णय घ्यायचा असेल तर ईश्वर न करो ती वेळ येऊ नये. संघटनेशी आपलं विवाहबंधनासारख बंधन असतं. नकळत आपण एका आयडॉलॉजीवर प्रेम केलेलं असतं. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात असा निर्णय घ्यावा लागणं हे दुख:दायक असतं. कोणालाही असा निर्णय घ्यायची वेळ येऊ नये.अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

अमित शाह यांची भेट घेणार..!

दरम्यान, आपल्या मनातील खदखद अमित शाह यांना बोलून दाखवयची आहे. पण अद्याप त्यांनी वेळ दिलेला नाही. असं देखील पंकजा म्हणाल्या. अमित शाह वेळ देतील तेव्हा त्यांना मी भेटेल आता तर सत्तेत आणखी एक पार्टनर आहे. त्यामुळे राजकीय गणितं बदलली आहेत. असं देखील त्या म्हणाल्या.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर केलं भाष्य

यावेळी पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्यावर झालेल्या कारवाई विषयी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते की, कोणत्याही सहकारी साखऱ कारखान्याला नोटीस पाठवली असेल तर त्याला उत्तर देता येतं. नोटीस पाठवणं हे तपास यंत्रणांचं काम आहे. त्याला उत्तर दिलं की नोटीस रद्द होतात. जर ऑडिटमध्ये काही गडबड जाली असेल तर पंकजा मुंडे त्याला उत्तर देतील. बावनकुळे यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेवर पंकजा यांनी उत्तर दिलं आहे.

बावनकुळेंच्या विधानावर पंकजा मुंडे या असहमत दिसून आल्या. त्या म्हणाल्या की, ही नोटीस नाही कारवाई आहे. त्यांना मी काय बोलू. त्यांना त्याची योग्य माहिती नाही, असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in