"तुम्ही दादांशी बोलून घ्या, त्यांनी संकेत दिले की...", राजकारणात सक्रिय होण्याविषयी जय पवारांचं सूचक विधान

पार्थ पवार हे तर आधिपासून राजकारणात सक्रिय होतेच मात्र आता त्यांच्या पाठोपाठ जय पवार यांनी देखील त्यांच्या आगमनाचे संकेत दिले आहेत
"तुम्ही दादांशी बोलून घ्या, त्यांनी संकेत दिले की...", राजकारणात सक्रिय होण्याविषयी जय पवारांचं सूचक विधान

अजित पवार यांनी राज्याच्या मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आपली पकड मजबूत करण्यासाठी तयारी सुरु केली आहे. तसंच अजित पवार यांची दोन्ही मुलं देखीले राजकारणात सक्रिय होताना दिसत आहेत. पार्थ पवार हे तर आधिपासून राजकारणात सक्रिय होतेच मात्र आता त्यांच्या पाठोपाठ जय पवार यांनी देखील त्यांच्या आगमनाचे संकेत दिले आहेत. यावल बोलताना त्यांनी तुम्ही दादांशी बोलून घ्या, त्यांनी सिग्नल दिला की मी रेडी आहे. असं त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामतीत शनिवारी सभा पार पडली. या दोन दिवसांत अजित पवार याचं धाकटे चिरंजीव जय पवार यांनी बारामतीतील राष्ट्रवादीच्या शरह कार्यलयाला भेटी दिली. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी त्यांचं औक्षण देखील केलं. यावेळी मी तुमचं कौतूक करायला आलो आहे, असं जय पवार म्हणाले.

बारामतीच्या कार्यकर्त्यांनी जय पवारांनी लवकरच राजकारणात सक्रिय व्हावं, अशी मागणी केली. यावेली बोलताना जय पवार म्हणाले की, तुम्ही दादांशी बोलून घ्या, त्यांनी मला संकेत दिले की मी लगेच तयार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत जय पवार निवडणुकीच्या खाड्यात उतरले तर नवल वाटायला नको.

logo
marathi.freepressjournal.in