"काँग्रेस गद्दार तर भाजप महागद्दार", विश्वास ठेवण्याजोगं नेतृत्व भाजपात नसल्याचं सांगत जानकरांचा स्वबळाचा नारा

सांगलीत काढलेल्या जनस्वराज्य यात्रेदरम्यान विटा येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी काँग्रेस आणि भाजपवर टीका केली
"काँग्रेस गद्दार तर भाजप महागद्दार", विश्वास ठेवण्याजोगं नेतृत्व भाजपात नसल्याचं सांगत जानकरांचा स्वबळाचा नारा
Published on

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी काँग्रेस आणि भाजपवर सडकून टीका केली आहे. काँग्रेर गद्दार तर भाजप महागद्दार आहे. या दोन्ही पक्षांपासून राष्ट्रीय समाज पक्ष समान अंतरावर राहणार असल्याचं महादेव जानकर यांनी सांगितलं. रासपच्या प्रचारासाठी व जनतेचं मत जाणून घेण्यासाठी त्यांनी सांगली लोकसभा मतदार संघात जनस्वराज्य यात्रा काढली होती. शनिवारी सांगलीच्या आटपाडीतून सुरु करण्यात आलेल्या या यात्रेचा शेवट जत तालुक्यातील संख या ठिकाणी करण्यात आला. यावेळी बोलताना जानकर यांनी काँग्रेस आणि भाजपवर निशाणा साधला.

महादेव जानकर यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, काँग्रेस सत्तेत असताना त्यांनी लहान पक्ष संपवले. आता भाजप तेच काम करत आहे. सत्ता मिळवताना भाजपला लहान पक्षांची गरज भासली, आता सत्ता मिळाल्यावर ओझं झालं. आमचा पक्ष एनडीएचा घटक पक्ष असूनही आम्हाला विचारलं जात नाही. गोपीनाथ मुंडे यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही युती केली होती. मात्र, आता विश्वास ठेवावं असं नेतृत्व भाजपकडे नाही. त्यांच्याशी युती करु आम्ही चुकच केली.

काँग्रेस गद्दार असून आता संधी असताना त्यांनी शहाणपणाने वागण्याची गरज असल्याचही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, जो तो आपला पक्ष वाढवाण्यासाठी प्रयत्न करत आहे, आता आम्हालाही तेच करायचं असल्याचं त्यांनी सांगितलं. सध्याच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पांढऱ्या कपड्यातील टगे असून सर्वसामान्य माणूस मात्र शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे. आगामी लोकसभेसाठी आपण कोणाशी युती अथवा आघाडी केलेली नाही. सांगतीतून काष्ट्रीय समाज पार्टी स्वबळावर मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याचं जानकर यांनी सांगितलं.

logo
marathi.freepressjournal.in