जितेंद्र आव्हाड अजित पवार गटावर बरसले ; प्रश्नांची सरबत्ती करत म्हणाले...

सोमवारची पत्रकार परिषद ही खोटं कसं खरं आहे हे सांगण्यासाठी होती असा टोला देखील आव्हाड यांनी यावेळी लगावला.
जितेंद्र आव्हाड अजित पवार गटावर बरसले ; प्रश्नांची सरबत्ती करत म्हणाले...
Published on

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटावर प्रश्नांची सरबत्ती करत टीका केली आहे. अजित पवारांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून कोणी नेमलं? त्यांना कोणी पाठिंबा दिला? त्यांचे काही पुरावे आहेत का? असे प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी विचारले आहेत. विधीमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष नाही. विधीमंडळता निवडून येणारे सदस्य हे राजकीय पक्षाचे घटक सांगत सोमवारची पत्रकार परिषद ही खोटं कसं खरं आहे हे सांगण्यासाठी होती असा टोला देखील आव्हाड यांनी यावेळी लगावला.

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून पक्षाचे अध्यक्ष हे अजित पवार असून त्यासंबंधित बैठकीत निर्णय झाल्याचं सांगितलं होतं. जितेंद्र आव्हाड यांनी त्यावर हल्लाबोल केला. ३० जून रोजी अजित पवार गटाने बैठक घेऊन अजित पवार यांना अध्यक्ष केल्याचं जाहीर केलं. त्यांनी फोनवरुन बैठक घेतल्याचं सांगितलं. फोनवरुन बैठक होत नाही. अजित पवार यांना अध्यक्ष म्हणून कोणी नेमलं? त्यांना अध्यक्ष करण्यासाठी कोणाचा पाठिंबा होता? यासंबंधित काहीही पुरावा नाही, अजित पवार गट खोटं बोलत आहे.

अजित पवार गटाने सोमवारी घेतलेली पत्रकार परिषद ही खोटं कसं खरं आहे दाखवण्यासाठी होती, असा आरोप आव्हाड यांनी केला. शरद पवार हेच आमचे अध्यक्ष आहेत असं अजित पवार यांनी ३ जूलै रोजी मान्य केलं होतं. मग अजित पवार अचानक अध्यक्ष कसे झाले? पक्षातल्या ९५ टक्के लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. शरद पवार यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहेत. दरम्यान, अजित पवार हे अध्यक्ष होण्यापूर्वी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सही कशी करतात? प्रफुल पटेल यांनी त्याला पाठिंबा दिला होता. त्यांची देखील त्यावर सही असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की, आम्हाला पंजाब केरळ, दिल्ली तामिळनाडू, गुजरात महाराष्ट्रसह ज्याठिकाणी आमचा पक्ष आहे. तिथून सर्वांनी शरद पवार यांना अध्यक्ष करा अशी मागणी केली होती. त्यानंतर पक्षाच्या अध्यक्षपदासाठी शरद पवार यांचं नाव घोषित करण्यात आलं. त्यांनी आम्ही इलेक्शन घेतलं नसल्याचा आरोप केला तो खोटा आहे. आम्ही अध्यक्ष पदासाठी इलेक्शन घेतलं होत. निवडणूक आयोगाकडे त्याची कागदपत्र सादर केली आहेत.

logo
marathi.freepressjournal.in