सोमय्यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी जितेंद्र आव्हाडांनी मांडली भूमिका ; मुलगी नताशा म्हणाली, "बाबा हे..."

एखाद्याला ५ मिनीटात उद्ध्वस्त करणं हे मला तरी काही पटत नसल्याचं आव्हाड म्हणाले
सोमय्यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी जितेंद्र आव्हाडांनी मांडली भूमिका ; मुलगी नताशा म्हणाली, "बाबा हे..."

भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. याचे पडसाद विधिमंडळाच्या अधिवेशनात देखील उमटले. विरोधकांनी हे प्रकरण उचलून धरत सत्ताधारी पक्ष तसंच किरीट सोमय्या यांच्यावर चांगलाच हल्ला चढवला. असं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणात वेगळी भूमिका घेतल्याने सर्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे.

या प्रकरणावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, राजकारणाचा स्तर प्रचंड खालावला आहे. वैयक्तीक हल्ले करुन एखाद्याचे राजकीय जीवन संपवायचं, या प्रकाराचा मी जाहीर निषेध करतो. तुम्ही त्यांचं वैयक्तीक जीवन संपवता ; तेव्हा त्याचं घर, दार, त्याची पत्नी, मुले, सुना या सगळ्यांवर त्याचा परिणाम होतो. तो आपला राजकीय शत्रू असता तरी तो आपला विचारांचा शत्रू आहे. वैयक्तीक हल्ला करून त्याचं वयक्तीक आयुष्य उद्धवस्त करण्याचा अधिकार आपल्याला कोणालाच नाही, असं अव्हाड यांनी म्हटलं आहे.

याविषयी बोलताना ते म्हणाले की, एका व्यक्तीबद्दल जे काही फिरत आहे आणि लोक त्याबद्दल टाळ्या देत आहेत. हे काही योग्य नाही असं मला वाटतं. राजकारण्यांनी थोडी संवेदनशिलता बाळगायला हवी. एखाद्याला समाजीवनामध्ये उद्ध्वस्त करणं हे फार सोप्प आहे. ३०-४० वर्षे देऊन या स्तराला आलेला असताना एखाद्याला ५ मिनीटात उद्ध्वस्त करणं हे मला तरी काही पटत नाही. असं मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत आपलं मत मांडल आहे. यावर आव्डाय यांची कन्या नताशा आव्हाडने त्यांच्या ट्विटला रिट्विट करत सोमय्या यांच्याबद्दलचा किस्सा सांगितला आहे. नताशा म्हणाली की, बाबा तुम्ही जेव्हा कोविडमध्ये आजारी होता, तेव्हा हेच किरीट सोमय्या तुम्ही आजारी नाहीतच, नाटक करत आहात असे खोटे आरोप करत होते. तुम्ही आजारी असल्याचा पुरावा मागत होते. तेव्हा आपल्या परिवाराने यांच्यामुळे मोठे मानसिक त्रास भोगले. तरी आज किरीट सोमय्या यांच्या खासगी आयुष्याच्या हक्कांसाठी तुम्ही उभे राहिलात हे अभिमानास्पद आहे. असं रिट्विट नताशe आव्हाडने केलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in