"ईडी झोपेची गोळी घेऊन अशी झोपली की...", कन्हैय्या कुमारची कोल्हापूरमधून फटकेबाजी

"ईडी झोपेची गोळी घेऊन अशी झोपली की...", कन्हैय्या कुमारची कोल्हापूरमधून फटकेबाजी

भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूरमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार यांनी हजेरी लावली

भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूरमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार यांनी हजेरी लावली. यावेळी कन्हेय्या यांनी भाजपवर सडकून टीका केली. भाजपवर टीका करणाता कन्हैय्या कुमार म्हणाले की, ते लोक तु्म्हाला खोटा इतिहास सांगतील. परंतु तुम्हाला तुमच्या विचारांवर ठाम राहायचं आहे. आपला देश आणि स्वातंत्र्य आपल्याला टीकवून ठेवायचं आहे. त्यात काँग्रेस आघाडीवर असेल. असं कन्हैय्या म्हणाले.

देशात मुस्लीमांची संख्या वाढली तर भारतातील लोकशाही संविधान संपून शरिया कादया लागू होईल, असा मेसेज आपल्याला का येतात? ही भीती का परसवली जातेय? कारण तुम्ही अन्य गोष्टींचा विचार करु नये, असा सांगत कन्हैय्याने कोल्हापूरकरांना ठाम राहायला सांगितलं. यावेळी त्याने घराणेशाहीवर बोलणाऱ्या भाजपवर टीका केली.

कन्हैय्या कुमार म्हणाले की, हे लोक घराणेशाहीवर बोलतात. पण यांच्याकडे घराणेशाही असली तर ती योग्य आणि दुसरीकडे असली तर ती चुकीची ठरते. असं म्हणत त्यांनी अजित पवारांच्या मुद्याला हात घातला. अजित पवार महाविकास आघाडीत होते तेव्हा ते भ्रष्टाचारी होते. स्वत: पंतप्रधान मोदींनी त्यांच्यावर ७५ हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप लावले होते. त्यानंतर ते भाजपला जाऊन मिळाले. अजित पवार भाजपासोबत घेल्यावर ईडी झोपेची गोळी खाऊन झोपली. अजित पवारांच्या घरचा पत्ता विसरली, असं देखील ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in