KCR Admitted At Hospital: बाथरुमध्ये पडल्याने केसीआर यांना दुखापत; सध्या प्रकृती स्थिर,पण...

केसीआर यांच्या मुलीने ट्वीट करून त्यांच्या दुखापतीची माहिती दिली आहे
KCR Admitted At Hospital: बाथरुमध्ये पडल्याने केसीआर यांना दुखापत; सध्या प्रकृती स्थिर,पण...

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चंद्रशेखर राव पाय घसरुन पडल्यामुळे त्यांना दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. केसीआर यांना हैदराबादच्या यशोदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. केसीआर काल (गुरुवारी) रात्री एररावल्ली येथील त्यांच्या फार्महाऊसवर पाय घसरुन पडले आहेत. आता त्यांच्यावर हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

केसीआर यांच्या मुलीने ट्वीट करून त्यांच्या दुखापतीची माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीट करून सांगितलं आहे की, "बीआरएस सुप्रीमो केसीआर यांना किरकोळ दुखापत झाली असून ते सध्या रुग्णालयात तज्ज्ञांच्या देखरेखीखाली आहेत. पाठिंबा आणि शुभेच्छांमुळे वडील लवकरच बरे होतील. तुमच्या सर्वांच्या प्रेमाबद्दल धन्यवाद.."

दरम्यान, तेलंगणातील विधानसभा निवडणुकीचे निकाल 3 डिसेंबर रोजी जाहीर झाले होते. काँग्रेसने तेलंगणात स्पष्ट बहुमत मिळवत सरकार स्थापन केले असून दोनदा तेलंगणाचे मुख्यमंत्री पद भूषवलेल्या केसीआर यांची यंदा मुख्यमंत्रीपदाची हॅट्रिक करण्याची संधी काँग्रेसने हिसकावून घेतली आहे. काँग्रेसचे नेते रेवंत रेड्डी यांनी गुरुवारी तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या शपथविधी सोहळ्यात सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in