मनीष सिसोदियांच्या आठवणीत केजरीवाल भावूक; व्यासपीठावरच फुटला अश्रूंचा बांध

यावेळी त्यांनी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांचा उल्लेख करत आज मला मनीषजींची खूप आठवण येत असल्याचं सांगितलं.
मनीष सिसोदियांच्या आठवणीत केजरीवाल भावूक; व्यासपीठावरच फुटला अश्रूंचा बांध

आज दिल्लीतल्या बवाना परिसरामधील दरियापूर गावातील स्कूल ऑफ स्पेशलायज्ड एक्सलन्सच उद्घाटन पार पडलं. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते हे उद्घाटन संपन्न झालं. यावेळी उपस्थितांना संबोधताना केजरीवाल हे भावूक झाल्याचं पाहावयास मिळालं. यावेळी बोलताना केजरीवाल यांचा कंठ दाटून आला होता. ते रडणं रोखून धरण्याचा प्रयत्न करत होते. पण एक क्षण असा आला ज्यावेळी त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. यावेळी त्यांनी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांचा उल्लेख करत आज मला मनीषजींची खूप आठवण येत असल्याचं सांगितलं. तसंच हे मनीषजींचं स्वप्न होतं, असं देखील केजरीवाल म्हणाले.

या वेळी बोलताना केजरीवाल यांनी भाजपला चांगलंच धारेवर धरलं. आपण सुरु केलेली शैक्षणिक क्रांती थांबावी असं भाजपला वाटतं. पण आम्ही असं होऊ देणार नाही. या कामाची सुरुवात मनीषजींनी केली होती. सर्व मुलांना उत्तम शिक्षण मिळावं अशी त्यांची इच्छा होती. अशा चांगल्या मानसाला भाजप सरकारने तुरुंगात टाकलं. ते चांगल्या शाळा बांधत नसते किंवा शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करत नसते तर ते आज तुरुंगात नसते, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना केजरीवाल म्हणाले की, आम्हाला मनीष सिसोदियांचं स्वप्न पुर्ण करायचं आहे. सत्याचा कधीही पराजय होत नाही. मनीषजी लवकरच तिहार तुरुंगातून बाहेर येतील. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी प्रत्येक मुलाने शिक्षण घेतलं पाहिजे, हे सिसोदियांचं स्वप्न होतं आणि ते त्या दिशेने क्रांतिकारी कार्य करत होते, असं सांगितलं. असं असून देखील त्यांना गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगात डांबून ठेवलं असल्याचं केजरीवाल म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in