किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; 'या' प्रकरणात २० हजार कोटींच्या घोटाळ्याबाबत जनहित याचिका दाखल

सोमय्या यांनी याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात २० हजार कोटींचा घोटाळा म्हणून जनहित याचिका दाखल केली आहे.
किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप;  'या' प्रकरणात २० हजार कोटींच्या घोटाळ्याबाबत जनहित याचिका दाखल
Published on

भारतीय जनता पक्षाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे सरकारच्या काळातील सदनिका प्रकरण बाहेर काढलं आहे. या ३५ हजार सदनिकांच्या प्रकल्पात २० हजार कोटींच्या घोटाळ्याचं कारस्थान रचल्याचं सांगत जनहित याचिका दाखल केली असल्याचं किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केलं आहे.

मार्च २०२२ मध्ये मुंबईत ३५ हजार प्रकल्पग्रस्त सदनिका बनविण्यासाठी कंत्राट काढलं. शाहिद बलबा आणि अतुल चोरडिया या बिल्डरांना ६ कंत्राट दिले. त्यातला एक प्रकल्प मुलुंड पूर्व केळकर कॉलेज जवळ दुसरा कांजुरमार्ग इथं चांदणी बोरी इथं होणार होता. तर प्रभादेवी इथं आमि जुहू मालाड इथं असे प्लान होते. या प्रकल्पाच्या माध्यमातून बिल्डर लोकांनी २० हजार कोटी लुटण्याचं कारस्थान रचलं होतं, असं किरीट सोमय्या म्हणाले. सोमय्या यांनी याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात २० हजार कोटींचा घोटाळा म्हणून जनहित याचिका दाखल केली आहे.

ते पुढे बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलुंडचा प्रकल्प थांबवावा, उद्धव ठाकरेंचे हे कटकारस्थान थांबवावं लागणार आहे. मी या प्रकरणामध्ये महाराष्ट्र सरकारलाही प्रतिवाही म्हणून नमूद केलं आहे. सर्व घोटाळ्यांवर इक्बाल चहल यांच्या सह्या आहेत. या प्रकरणाची एसटीआय नेमून चौकशी होईपर्यंत त्यांना पदावरुन बाजूला करावी, अशी मागणी देखील सोमय्या यांनी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in