मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांचा केलेल्या एकेरी उल्लेखावर अजित पवार म्हणतात...

अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांचं नाव घेण्याचं टाळलं आहे.
मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांचा केलेल्या एकेरी उल्लेखावर अजित पवार म्हणतात...

राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोप हे सुरुच असतात. मात्र, सध्या आरोप करताना पातळी घसरत चालल्याचे दिसून येत आहे. मागे ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना पत्रकारांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविषयी प्रश्न विचारल्यावर ते ऑन कॅमेरा थुंकले होते. त्यानंतर राऊत यांनी या प्रकरणावर स्पष्टीकर देखील दिलं होतं. सध्या उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे आणि भाजप नेते गिरीष महाजन यांच्यात देखील आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. हे आरोप करताना बऱ्याचदा नेत्यांकडून एकेरी भाषेचा उल्लेख केला जातो.

भाजपनेते मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि भाजप आमदार गोपीचंड पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. ही टीका करताना त्यांनी पवारांचा एकेरी भाषेत उल्लेख केला आहे. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भारतीय जनता पक्षात ओबीसींचा सन्मान होत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वारंवार केला जात आहे. यावर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आमचे प्रदेशाध्यक्ष ओबीसी आहे. देशाचे पंतप्रधान ओबीसी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ओबीसी आहेत का? छगन भुजबळ स्वत:ला ओबीसी नेते म्हणवतात, पण ते कुठे आहेत? सत्तेत असताना त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपद होतं मात्र त्यांना तिथे महत्वं नव्हतं, असं मुनगंटीवार म्हणाले आहेत.

या विषयावर पुढे बोलताना मात्र त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला. ते म्हणाले की, "ओबीसींचा पंतप्रधान झाल्याने काँग्रेस राष्ट्रवादीच्या पोटात दुखत आहे. काँग्रेसचा पंतप्रधान कोण आहे? तर एक ब्राम्हण, जो रोज जाणवं घालतो. 22 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण आहे? मराठा शरद पवार, तो आम्हाला अक्कल शिकवणार का? जनतेलाही समजल पाहिजे. मायावी चेहरे घेऊन बसलेल्यांपासून त्यांनी दूर राहिलं पाहिजे. ही लोक आपल्या समोरचा धोका आहेत", असं मुनगंटीवार म्हणाले आहेत.

तसंच आमदार गोपीचंद पडळकर यांनी एका कार्यक्रमात बोलताना पवारांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला आहे. ते म्हणाले की, "गेल्या वर्षी जयंतीला पवारांनी मस्ती केली का नाही? यावर्षी पवार का आला नाही? पवार चार वेळा मुख्यमंत्री, बारा वर्ष केंद्रात मंत्री होता. मागचं मला माहिती नाही. 1999 पासून ते 20214 पर्यंत राज्यात यांच सरकार होतं, एकदाही ते चौंडीला आले नाहीत." असं वक्तव्य पडळकर यांनी केलं होतं.

मंत्री सुधीर मुनगंटीवर आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांचा केलेल्या एकेरी उल्लेखाबाबत अजित पवार यांना विचारल्यावर त्यांनी संस्कार होतील तसंत ते बोलणार आणि वागणार असं उत्तर दिलं आहे. तसंच सुधीर मुनगंटीवर यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. पण दुसऱ्याकडून कशाचीही अपेक्षा नाही. त्यावर बोलू शकत नाही, असं म्हणत अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांचं नाव घेण्याचं टाळलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in