Lok Sabha Election Results 2024 LIVE: उत्तर प्रदेशात मोठा उलटफेर; भाजपला झटका

Election Results 2024 Live Updates: ८० दिवस सात टप्प्यात झालेल्या निवडणूकीचे निकाल आज अखेरीस स्पष्ट होत आहे. एक्झिट पोलचे निकाल आणि आजच्या मतमोजणीचे निकाल सारखेच लागतात का याकडे देशाचे लक्ष आहे.
Election Results 2024 LIVE, NDA Vs INDIA Alliance Vote Counting

Lok Sabha Election Results Will Be Announced On June 4: जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात निवडणूक रणसंग्रामात कोण 'बाजीगर' ठरणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा १९ एप्रिल २०२४ रोजी सुरु झाला आणि १ जून २०२४ रोजी सातव्या टप्प्यासोबत संपला. आता या सर्व निवडणुका पूर्ण झाल्यानंतर, या सर्व टप्प्यांचे निकाल ४ जून २०२४ रोजी घोषित केले जात आहेत. निवडणूक आयोगाकडून हे निकाल आज ८ वाजल्यापासून जाहीर करण्यास सुरुवात झाली आहे.

उत्तर प्रदेशात भाजपला झटका

संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत झालेल्या मतमोजणीनुसार, देशभरात एनडीए - २९४ इंडिया - २३३ अन्य - १६ जागांवर आघाडीवर आहेत. तथापि, उत्तर प्रदेशात मोठा उलटफेर बघायला मिळाला आहे. येथे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए ३४ तर काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची इंडिया आघाडी ४६ जागांवर आघाडीवर आहे. समाजवादी पक्ष येथील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत आहे. समाजवादी पक्ष ३६ जागांवर तर भाजप ३३ जागांवर आघाडीवर आहे. विशेष म्हणजे २०१९ च्या निवडणुकीत एकट्या भाजपने यूपीमध्ये ६२ जागा जिंकल्या होत्या.

खाली वाचा आतापर्यंतचे अपडेट्स -

> Amethi: अमेठीमधून भाजपाच्या स्मृती इराणी यांचा पराभव

> Raebareli: रायबरेलीमधून राहुल गांधी ४ लाख मतांनी विजयी

> Mandi: मंडीमधून भाजप उमेदवार कंगना रणौतचा विजय, जिंकल्यानंतर पहिली प्रतिक्रिया देत म्हणाली, " हा सनातनचा विजय आहे."

> Andhra Pradesh: आंध्र प्रदेशमध्ये १६ उमेदवारांसह टीडीपी आघाडीवर

> Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमध्ये कैसरगंजमधून ब्रिज भूषण सिंह यांचा मुलगा करण सिंह, १ लाखाहून अधिक मतांनी आघाडीवर आहे.

> सकाळी ११ वाजेपर्यंतचे कल एनडीए - २८६ इंडिया - २३० अन्य - २६

> मोदी सरकारचे किती मंत्री मागे आहेत? स्मृती इराणी, नारायण राणे, राव इंद्रजित सिंग, नित्यानंद राय आणि गिरीराज सिंग यांच्यासह मोदी सरकारचे सहा मंत्री पिछाडीवर आहेत. त्याचवेळी पीएम मोदी आणि नितीन गडकरी आघाडीवर आहेत.

> सकाळी १० वाजेपर्यंतचे कल आले; एनडीए-इंडियामध्ये 'कांटे की टक्कर' एनडीए - २३९ इंडिया - २७० अन्य - ३२ - वारणसीमधून अखेर पंतप्रधान मोदींनी घेतली आघाडी

> Himachal Pradesh Results Update: : हिमाचल प्रदेशात कोण आणि कुठे पुढे? हमीरपूरमधून अनुराग ठाकूर पुढे – १७,३४३ मते कांगडामधून भाजपचे राजीव भारद्वाज पुढे - ४०,०२७ मते मंडीतून भाजपच्या कंगना राणौत पुढे - १०,४८८ मते शिमल्यातून भाजपचे सुरेश कश्यप पुढे - १५,६१३ मते

> ईसीआयच्या 311 जागांच्या सुरुवातीच्या ट्रेंडनुसार, भाजप 152 जागांवर आघाडीवर आहे, काँग्रेस 61 जागांवर आघाडीवर आहे, तर समाजवादी पार्टी 32 जागांवर आघाडीवर आहे.

Gujarat Lok Sabha Election Results: गुजरातमध्ये भाजप २० जागांवर तर काँग्रेस ६ जागांवर आघाडीवर आहे.

> वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदी पिछाडीवर, अजय राय पुढे.... उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणुकीच्या ट्रेंडमध्ये मोठे उलथापालथ पाहायला मिळत आहे.

> Himachal Pradesh Lok Sabha result: कंगना रणौत आघाडीवर

> गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अमित शहा ७३११ मतांनी आघाडीवर आहेत.

> सकाळी ९ वाजेपर्यंतचे कल : एनडीए - 275, इंडिया - 216, इतर - 50

> Lok Sabha Election Results 2024 : सध्या एनडीए २५३ जागांवर आघाडी आहे, तर इंडिया आघाडी १६४ जागांवर आघाडीवर आहे.

> Narendra Modi VS Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आघाडीवर तर काँग्रेस खासदार राहुल गांधी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली या दोन लोकसभा जागांवर आघाडीवर आहेत.

> वायनाड आणि रायबरेली दोन्ही मतदारसंघांतून राहुल गांधी आघाडीवर

> ८. ३० वाजेपर्यंतचे कल: देशात एनडीए - २१० , इंडिया- ९२ तर इतर- १३ तर राज्यात महायुती २१ आणि माविआ २१ इतर ०

> सकाळी ८:२४ वाजता --- नितीन गडकरी नागपूरमध्ये आघाडीवर, कोटामध्ये ओम बिर्ला आघाडीवर आहेत अरुण गोविल मेरठमध्ये पिछाडीवर, कर्नालमध्ये एमएल खट्टर पिछाडीवर, बीडमध्ये पंकजा मुंडे आघाडीवर, हैदराबादमध्ये ओवेसी आघाडीवर, आझमगरमध्ये धर्मेंद्र यादव आघाडीवर आहेत.

> ईशान्य मुंबईतून मिहीर कोटेचा आघाडीवर

> गांधी नगरमधून अमित शहा यांनी आघाडी घेतली आहे

> अमोल कोल्हे १४९ मतांनी आघाडीवर

> परभणीमधून संजय जाधव आघाडीवर

> राज्यात महायुती १७ तर माविआ १९ जागांवर आघाडीवर

> पंत्रप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून आघाडीवर

> सोलापुरातून प्रणिती शिंदे आघाडीवर

> नारायण राणे सिंधुदुर्गमधून आघाडीवर

> साताऱ्यातून उदयन राजे आघाडीवर

> मंडीमधून अभिनेत्री कंगना राणावत पिछाडीवर

> श्रीकांत शिंदे यांनी कल्याणमधून आघाडी घेतली आहे

> अमरावती लोकसभा निकालः काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांच्या विरोधात भाजपच्या नवनीत राणा आघाडीवर

> शिरूरमधून अमोल कोल्हे आघाडीवर

> बीडमधून पंकजा मुंडे आघाडीवर

> नागपूरमधून नितीन आघाडीवर

> दिंडोरीमधून भास्कर भांगरे आघाडीवर

> पुण्यातून मुरलीधर मोहोळ आघाडीवर

> बारामतीमधून सुप्रिया सुळे आघाडीवर

> मुंबई उत्तरमधून भाजपचे पियुष गोयल आघाडीवर तर भूषण पाटील पिछाडीवर

> गुजरातमधील सुरत लोकसभा मतदारसंघातून भाजपचे मुकेश दलाल बिनविरोध विजयी झाले आहेत.

> मतमोजणी सुरू, आधी पोस्टल मतपत्रिका मोजणार

- या जागांची लढत रंजक

महाराष्ट्रात अशा अनेक हायप्रोफाईल जागा आहेत ज्यांवर रंजक लढती पाहायला मिळणार आहेत-

डॉ.श्रीकांत शिंदे (शिवसेना) : कल्याण

अरविंद सावंत शिवसेना (UBT): मुंबई-दक्षिण

राजन बाबुराव विचारे शिवसेना (UBT): ठाणे

गोवळ पाडवी (काँग्रेस) : नंदुरबार

पंकजा मुंडे (भाजप) : बीड

पियुष गोयल (भाजप) : मुंबई-उत्तर

वर्षा गायकवाड (काँग्रेस) : मुंबई उत्तर मध्य

कपिल पाटील (भाजप) : भिवंडी

दानवे रावसाहेब दादाराव (भाजप) : जालना

> महाराष्ट्र लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये ४८ जागांसाठीची लढत १९ एप्रिलपासून सुरू झाली आणि राज्यात पाच टप्प्यात मतदान झाले. शेवटच्या टप्प्यातील मतदान २० मे २०२४ रोजी झाले. पहिल्या चार टप्प्यांच्या तारखा अनुक्रमे १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे आणि १३ मे होत्या.जागांच्या बाबतीत संपूर्ण देशभरात महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर आहे

> प्रतीक्षा अखेर संपली आणि निकालाचा दिवस आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा सत्तेत विक्रमी यश मिळणार की यंदा चित्र पालटणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in