जरांगेंच्या भूमिकेमुळे मराठा तरुणांचं नुकसान ; विजय वडेट्टीवारांचा आरोप

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्या जोर धरत असताना राज्याच्या राजकारणात रोज नवे दावे प्रतिदावे केले जात आहेत.
जरांगेंच्या भूमिकेमुळे मराठा तरुणांचं नुकसान ; विजय वडेट्टीवारांचा आरोप

राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन राजकारण चांगलच तापलं आहे. राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहे. अशाता राज्याचे विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. ओबीसींमध्ये समावेश झाल्यानं मराठा समाजाला फार लाभ होणार नाही. तसं झाल्यास मराठा समाजाला ओबीसीत केवळ तीन ते साडेतीन टक्के आरक्षण मिळेल, असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्याला विजय वडेट्टीवार यांनी दुजोरा दिला आहे. मराठ्यांना ईडब्ल्यूएस आरक्षणातून दहा टक्के आरक्षण मिळत असेल तर तो खूप मोठा फायदा होतो आहे. परंतु, जरांगे पाटलांना त्या फायद्यापेक्षा राजकीय फायदा करु घेण्याची मंशा असावी. जरांगे मराठा तरुणांच्या फायद्यापेक्षा राजकीय लोकांच्या भल्यासाठी आग्रही आहेत. असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्या जोर धरत असताना राज्याच्या राजकारणात रोज नवे दावे प्रतिदावे केले जात आहेत. अशातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा तरुणांच्या भविष्याच्या दृष्टीने भाष्य केलं आहे. जरांगे पाटलांच्या सध्याच्या भूमिकेमुळे मराठा तरुणांचं भविष्यात फार मोठं नुकसान होणार आहे. मराठा तरुणांनी या संदर्भात अभ्यास करावा, जरांगे पाटलांच्या म्हणण्यानुसार त्यांनी सर्व काही ठरवू नये. अभ्यास करुन त्यांनी भविष्याबद्दल निर्णय घ्यावा, असा सल्ला मराठा तरुणांना देत मनोज जरांगे पाटील-यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

ओबीसींमध्ये आजघडीला ३७२ जाती अस्तित्वात आहेत. त्यात परत ओबीसीमध्ये मराठ्यांना आरक्षण देऊन फार काही मिळणार नाही. उलट बाहेर राहून त्यांना जास्त फायदा होईल. खुल्या वर्गात फार जाती राहणार नाहीत. त्यामुळे मराठा तरुणांना नोकरी आणि सोयी सवलती संदर्भात फार मोठं नुकसान होणार आहे. त्यामुळे मराठा तरुणांनी अभ्यास करुन विचार करुन आपण कोणाला साथ देत आहोत. आपलं भलं कशात आहे. हित कशात आहे. याचा विचार करावा, असं आवाहन देखील विजय वडेट्टीवार यांनी मराठा तरुणांना केलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in