खरी शिवसेना, गोगावलेंचा व्हीप ते आमदार अपात्रता; वाचा नार्वेकरांच्या महानिकालातील महत्त्वाचे मुद्दे

राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल अखेर समोर आला आहे. निकालात शिवसेना ठाकरे गटाला मोठे धक्क्यावर धक्के बसले आहेत.
खरी शिवसेना, गोगावलेंचा व्हीप ते आमदार अपात्रता; वाचा नार्वेकरांच्या महानिकालातील महत्त्वाचे मुद्दे

राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल अखेर समोर आला आहे. निकालात शिवसेना ठाकरे गटाला मोठे धक्क्यावर धक्के बसले आहेत. एकनाथ शिंदे यांचा पक्ष हाच मूळ शिवसेना पक्ष आहे. शिंदे यांच्या पक्षाकडे बहुमत आहे, असा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलाय. त्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा झटका आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना, असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी मांडलेले महत्वाचे मुद्दे-

1) घटना, नेतृत्व आणि विधिमंडळ बहुमत या गोष्टी पक्ष ठरवताना आधार ठरल्या. पक्ष ठरवताना २०१८ मधील शिवसेना पक्षाची घटना महत्वाची आहे. दोन्ही गटाने वेगवेगळी घटना दिली. उद्धव ठाकरे यांनी पक्षाची जी घटना दिली त्यात तारीखच नाही. यामुळे निवडणूक आयोगाने दिलेल्या घटनेचा मी आधार घेत आ

2) ठाकरेंनी 2018 मध्ये दिलेली घटना रेकॉर्डवर घेण्यात आलेली नाही. 1999ची घटना शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे दाखल झालेली अभिलेखावरील एकमेव घटना आहे, 2018 सालची घटना ग्राह्य धरण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. मात्र 2018 सालच्या घटनेची नोंद निवडणूक आयोगाकडे नाही. निवडणूक आयोगाकडे असलेली प्रत ही शिवसेनेची 1999 सालची घटना असून तीच ग्राह्य धरली जाणार असल्याचं नार्वेकर म्हणाले.

3) शिवसेना पक्षप्रमुखाला थेट कुणालाही पक्षातून काढता येत नाही. एकनाथ शिंदेंना पक्षातून काढून टाकण्याचा ठाकरेंना कोणताही अधिकार नाही. राष्ट्रीय कार्यकरीणीसोबत चर्चा करुनच पक्षातून हकालपट्टीचा निर्णय घेता येतो. शिवसेना पक्ष प्रमुखांना कोणालाही पक्षातून काढण्याचे अधिकार नाहीत, त्यामुळे एकनाथ शिंदेंना विधीमंडळ गटनेतेपदावरून हटवण्याचा अधिकार नाही.

4) शिंदेगट हीच खरी शिवसेना आहे. गोगावलेंची नियुक्ती बरोबर, त्यांचाच व्हीप योग्य असल्याचं सांगत सुनील प्रभु यांचा व्हीप अवैध ठरवतं नार्वेकर यांनी ठाकरे गटाला मोठा धक्का दिला. ठाकरे गटाच्या नोटीसप्रमाणे शिंदे गटाचे सदस्य संपर्काच्या बाहेर गेल्याचं सादर पुराव्यांवरून सिद्ध होत नाही. सुनील प्रभूंना पक्षासाठी कोणतीही बैठक बोलावण्याचा अधिकार नव्हता. त्यामुळे शिंदे गटाच्या सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी फेटाळली जात असल्याचं नार्वेकरांनी सांगितलं.

5) शिंदेंचे 16 आमदार पात्र असल्याचा निकाल नार्वेकरांनी दिला. ठाकरे गटाच्या आमदारांवरही अपात्रतेची कारवाई नाही. एकीकडे शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही, असं स्पष्ट करतानाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी ठाकरे गटाच्या आमदारांनाही अपात्र करता येणार नाही, असं स्पष्ट करत शिंदे गटाची ही मागणी फेटाळून लावली आहे.

logo
marathi.freepressjournal.in