हरयाणात बहुमत चाचणी घेण्याची ‘जेजेपी’ची राज्यपालांकडे मागणी

हरयाणाचे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांचे सरकार अल्पमतात आले असल्याने बहुमत चाचणी घ्यावी, अशी मागणी करणारे पत्र ‘जेजेपी’चे नेते दुष्यंत चौताला यांनी राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांना पाठविल्याने राज्यातील राजकीय वातावरण अधिकाधिक तापत असल्याचे बोलले जात आहे.
हरयाणात बहुमत चाचणी घेण्याची
‘जेजेपी’ची राज्यपालांकडे मागणी

हरयाणा : हरयाणाचे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांचे सरकार अल्पमतात आले असल्याने बहुमत चाचणी घ्यावी, अशी मागणी करणारे पत्र ‘जेजेपी’चे नेते दुष्यंत चौताला यांनी राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांना पाठविल्याने राज्यातील राजकीय वातावरण अधिकाधिक तापत असल्याचे बोलले जात आहे.

सैनी सरकारला दिलेला पाठिंबा तीन अपक्ष आमदारांनी मंगळवारी काढून घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे सैनी सरकार अल्पमतात गेले असल्याचे स्पष्ट झाले आहे, त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना बहुमत चाचणी घेण्याचे आदेश द्यावेत, असे चौताला यांनी दत्तात्रेय यांना पाठविलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे.

हरयाणातील सरकार पाडण्याची काँग्रेस पक्षाची इच्छा असल्यास आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, आता निर्णय काँग्रेसने घ्यावयाचा आहे, असे जेजेपीने एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

सरकारला धोका नाही - नायबसिंह

आपले सरकार भक्कम आहे, सरकारला कोणताही धोका नाही, असा दावा नायबसिंह सैनी यांनी केला आहे. माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनीही सरकारला धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in