तुम्ही कोणासाठी काम करता हे आम्हाला कळलं असून तुमच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. वेळोवेळी वेगवेगळी वक्तव्य करुन तुम्ही सरड्यासारखं रंग बदलत आहात. तुमच्यासारख्या विरोधी पक्ष देशात कुणी नाही, तुमची विचारधारा मराठ्यांविषयी द्वेष पेरणारी असून मराठ्यांचे मुडदे पडायला तुम्ही जबाबदार आहात, असा पटलवार मनोज जरांगे-पाटील यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर केला आहे. तसंच येत्या २४ डिसेंबरला मराठा समाजाचे वाटोळं करणाऱ्या सहा जणांची नावेही सांगतो असा इशारा देखील जरांगे यांनी दिला आहे.
मराठा आरक्षणावरुन राज्यात रान पेटले असून छनग भुजबळ-मनोज जरांगे यांच्यातल्या शाब्दिक वाद शमतो तोवर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मनोज जरांगे यांनी देखील जोरदार प्रत्यु्त्तर दिलं आहे. मराठा तरुणांनी अभ्यास करुन विचार करुन आपण कोणाला साथ देत आहे. आपलं भलं कशात आहे. हित कशात आहे. याचा विचार करावा, असं विधान वडेट्टीवार यांना केलं होतं. त्याला मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, आम्हाला मोडायचा सामूहिक कट तुम्ही रचला होता. आता फालतू शब्द बोलून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करत आहात. पण आमची मुलं दूधखुळी नाहीत. मराठ्यांचे मुडदे पडायला तुम्ही जबाबदार आहात. आता तुमच्या सल्ल्याची गरज नाही. अशा शब्दात जरांगे यांनी वडेट्टवार यांना सुनावलं आहे.
मनोज जरांगे म्हणाले की, अशा लोकांना गोरगरीब आठवत नहाी. मात्र आता हे कुणासाठी काम करता हे कळलं आहे. क्धी काय तर कधी काय? तुम्ही सरड्यासारखं रंग बदलत आहात. तुमच्यासाखा विरोधी पक्ष देशात कुणी नाही. मुळात यांची विचारधारा मराठ्यांविषयी विष पेरणारी आहे. हा मनोज जरांगे राजकारणासाठी करतो, असं अकही मराठा ओबीसी म्हणू शकत नाही. तुम्हाला मराठा समाजाशिवाय माया नाही. आम्हाला तुम्ही सांगायची गरज नाही. तुमच्यासारख्या करायचा की नाही. आमच्या मुलांच्या बुद्धी ठेप्यावर आहे. आमच्या मुलांना तुम्ही सांगायची गरज नाही. तुमच्या सारख्या लोकांनीच आम्हाला संपवलं. आहे. आम्हाला मोडायचा सामू हिक कट तुम्ही रचला होता. आता फालतू शब्द बोलून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करत आहेत. पण हे देणार नसल्याचं मनोज जरांगे म्हणाले.
दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी विजय वडेट्टीवार यांना इशारा देत इतर राजकीय नेत्यांना घाम फोडला आहे. ते म्हणाले की, तुम्ही काय चीज आहात ते आम्हाला आता कळले. तुम्ही ५ ते ६ जण काय नमुने आहेत. ते आम्हाला कळलं. त्यामुळे तुम्ही मराठ्यांचे शत्रू झालात. आता कुणबी नोंदीचे पुरावे मिळू लागले म्हणून काहीही बोलू लागले आहेत. मात्र थोडं थांबा मराठे आता काही दिवसात तुम्हाला सल्ले शिकवतील असं जरांगे म्हणाले. तसंच मराठा समाजाचं वाटोळं करणाऱ्या त्या ६ जणांचे नाव २४ तारखेला सांगतो, असा इशाराच मनोज जरांगे यांनी दिला आहे.