मविआच्या प्रचाराची आजपासून रणधुमाळी; बीकेसीतील एमएमआरडीएच्या मैदानात प्रचाराचे रणशिंग फुंकणार

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला १५ दिवस शिल्लक असून मविआच्या प्रचाराची रणधुमाळी उद्या बुधवारी बीकेसीतील मैदानातून सुरु होणार आहे
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रपीटीआय
Published on

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला १५ दिवस शिल्लक असून मविआच्या प्रचाराची रणधुमाळी बुधवारी बीकेसीतील मैदानातून सुरु होणार आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आदी दिग्गजांच्या उपस्थितीत मविआची भव्य सभा बीकेसी तील एमएमआरडीएच्या मैदानात सायंकाळी ५ वाजता होणार आहे.

या सभेत मविआचे जेष्ठ नेते कोणाचा समाचार घेणार याकडे महाराष्ट्रातील जनतेसह विविध राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे बुधवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून नागपुरात दुपारी १ वाजता ‘संविधान सन्मान संमेलनाला’ उपस्थित राहणार आहेत.

विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही पक्षांतील वरिष्ठ नेत्यांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. महायुतीने प्रचाराचा नारळ फोडला असून मविआ बीकेसीतील एमएमआरडीएच्या मैदानात प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in