मंत्री संदीपान भूमरेंची संजय राऊत यांच्यावर खोचक टीका ; म्हणाले, "संजय राऊत टीव्हीवर आल्यावर..."

राऊत यांना फक्त विरोध करण्याशिवाय दुसरं कुठलही काम नाही, असं देखील भुमरे म्हणाले आहेत.
मंत्री संदीपान भूमरेंची संजय राऊत यांच्यावर खोचक टीका ; म्हणाले, "संजय राऊत टीव्हीवर आल्यावर..."

शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील आरोप-प्रत्यारोप काही थांबयला तयार नाहीत. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीला वर्ष उलटूनही दोन्ही गटात शाब्दिक चकमकी घडत असतात. दरम्यान, शिंदे गटाचे नेते तथा रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत हे टीव्हीवर दिसल्यास लोकं चॅनल बदलतात, असा टोला भुमरे यांनी लगावला आहे.

ते म्हणाले की, "संजय राऊत काय बोलले याला कुठलाही अर्थ नाही. सकाळी ९ वाजता टीव्ही सुरु केल्यास संजय राऊत काहीतरी बरळत असतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. गेल्या बारा महिन्यात आम्ही ३६ सुधारित प्रशासकिय मान्यता काढल्या आहेत. मागील सरकारच्या काळात फक्त एकच काढण्यात आली होती. मागील सरकारच्या काळात का नाही काढल्या हे संजय राऊत यांना विचारलं पाहिजे. राऊत यांना फक्त विरोध करण्याशिवाय दुसरं कुठलही काम नाही. राऊत सकाळी टीव्हीवर दिसले तर लोक चॅनल बदलू लागले आहेत", अशी टीका रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी केली आहे.

संजय राऊतची मुख्यमंत्रीच काय कोणीही धास्ती घेऊ शकत नाही. ते पत्रकार म्हणून पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार होते. मग का नाही आले. संजय राऊत यांनी यायचं होतं तर त्यांनी पत्रकार परिषदेला यायचं होतं. त्यांनी कोणी अडवलं. पत्रकारांना तर कोणी अडवत नाही. संजय राऊत फक्त देखावा करतो, काही विचारु शकत नाही. मराठा समाजाचे मूक मोर्चे निघत असताना संजय राऊतने सामनात काय छापले होते. तुम्हा सर्वांना माहित आहे. त्यावेळी मूक मोर्चाची मुका मोर्चा म्हणून हेटाळणी केली होती. समाज हे विसरला नाही. कुठेतही उद्धव साहेबांना खुश करण्यासाठी संजय राऊतला हे नाटक करावं लागतं, अशी बोचरी टीका भुमरे यांनी संजय राऊत यांच्यावर केली.

logo
marathi.freepressjournal.in