"...तर मग रडायचं नाही", मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा शरद पवारांना टोला

जिथे सत्तेचा गैरवापर झाल्याची माहिती पंत प्रधानांकडे असेल तर त्यांनी सखोल चौकशी करून वस्तूस्थिती समाजासमोर ठेवावी. अशी मागणी पवार यांनी केली होती.
"...तर मग रडायचं नाही", मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा शरद पवारांना टोला

शरद पवार आतापर्यंत कुठलीही चौकशी लागली तर यात राजकारण आहे असं म्हणायचे. पण कालच्या पत्रकार परिषदेत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या बाजूला बसून सांगितलं की, पंतप्रधान मोदींना कोणाबद्दल शंका असेल तर त्यांनी चौकशी करावी. त्यांनी आजूबाजूला बसलेल्या लोकांकडे बघून हे विधान केले का काय हे तापसले पाहिजे. आता चौकशी झाली तर मग रडायचं नाही. आम्हाला त्रास दिला जातोय असं म्हणायचं नाही. चौकशीला सामोरे जाऊन उत्तरे देऊन त्यातील सत्य बाहेर येऊ द्यायला मदत करायची, असा टोला मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवार यांना लगावला आहे.

यावेळी बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, इंडिया बैठकीच्या आघाडीत जनतेच्या प्रश्नावर काहीच चर्चा होणार नाही. लालूप्रसाद यादव म्हणतात मोदींच्या नरडीवर बसायचं आहे. पण ही मुंबई आहे. २०२४ च्या निवडणुकीत सर्वांना तिरडीवर घेऊन लोकं जातील. नरडीवर बसण्यासाठी तुम्ही एकत्र येत आहात. देशाच्या विकासासाठी नाही. नरेंद्र मोदींना हटवण हा एकमेव किमान समान कार्यक्रम आहे, असं मुनगंटीवार म्हणाले.

शरद पवार काय म्हणाले होते?

मी प्रधानमंत्र्यांचं भोपाळचं भाषण ऐकलं त्यांनी काँग्रेसवर टीका केली, भ्रष्टाचाराची, राष्ट्रवादीवरही केली. त्यांनी राष्ट्रवादीवर टीका करताना राज्य सहकारी बँक आणि इरीगेशन घोटाळा या दोन्ही गोष्टी कटाक्षाने सांगितल्या. माझा पंतप्रधानांना एकच आग्रह आहे. ते देशाचे प्रधानमंत्री आहेत. जिथे सत्तेचा गैरवापर झाल्याची माहिती त्यांच्याकडे असेल तर त्यांनी सखोल चौकशी करून वस्तूस्थिती समाजासमोर ठेवावी. अशी मागणी पवार यांनी केली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in