उदयनिधी स्टॅलिनच्या मदतीला धावून आले एमके स्टॅलिन ; म्हणाले, "आपण चांद्रयान लॉन्च केलं तरी..."

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने मोठी टीका टीप्पणी होताना दिसत आहे.
उदयनिधी स्टॅलिनच्या मदतीला धावून आले एमके स्टॅलिन ; म्हणाले, "आपण चांद्रयान लॉन्च केलं तरी..."

सध्या सनातन धर्मावरुन देशाच्या राज्यकारणा खळबळ उडाली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने मोठी टीका टीप्पणी होताना दिसत आहे. उदयनिधी यांनी आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. आता मुख्यमंत्री एमकेस्टॅलिन हे आपल्या मुलाचा बचाव करण्यासाठी समोर आले आहेत.

उदयनिधी यांनी अनुसूचित जाती-जमाती आणि महिलांशी भेदभाव करणाऱ्या सनातन तत्वांबद्दल त्यांच मत व्यक्त केलं. कोणाच्याही भावना दुखावण्याचा त्यांचा हेतू नव्हता, असं स्टॅलिन म्हणाले.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना स्टॅलिन म्हणाले की, आक्रमक तत्वांविरोधात भूमिका भाजप समर्थक सहन करुन शकत नाहीत. उदयनिधी यांनी सनातन विचारांच्या लोकांचं नरसंहार करण्याचं आवाहन केल्याचं भाजपकडून खोटं पसरविण्यात आलं आहे, असं स्टॅलिन म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, आपण चांद्रयान लॉन्च केलं तरी देखील देशात काही लोक जातीवाद करत आहेत. वर्णव्यवस्थेच्या आधारावर सामाजिक भेदभाव केला जातो. धार्मिक ग्रंथांचा हवाला देत धार्मिक दाव्यांचं समर्थन करण्यात येतं. महिलांना काही लोकांकडून अजूनही अध्यात्मिक मंचावर बदमान केलं जातं. विधवा महिलांनी दुसरं लग्न करु नये. असे वेगवेगळे तर्क दिले जातात, असंही स्टॅलिन यावेली म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in