मराठा आरक्षणावरुन आमदार बच्चू कडूंचा राज्य सरकारला इशारा; म्हणाले, "दगा फटका केल्यास..."

मराठा आरक्षणावरुन आमदार बच्चू कडूंचा राज्य सरकारला इशारा; म्हणाले, "दगा फटका केल्यास..."

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरची मुदत वाढ दिली आहे.
Published on

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्यातील सगळे आमदार, खासदार एकत्र आले आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने २ जानेवारी पर्यंतची मुदत मागितली आहे. पण मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरची मुदत वाढ दिली आहे. मनोज जरांगे आणि राज्य सरकार मध्ये मध्यस्ती करण्यामध्ये बचू कडू यांनी महत्वपूर्ण भूमिका घेतली आहे. मात्र सरकारनं दगा फटका केला तर रस्त्यावर उतरू असा इशार बच्चू कडू यांनी दिला आहे.

गेले 15 वर्षी मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी लढत आले आहेत. त्यांनी त्यासाठी जमीनी विकल्या. सततच्या उपोषणामुळे त्याची प्रकृती खालावली तरीही ते लढत आहेत. जरांगेंनी सरकारला २४ डिसेंबर तारीख दिली आहे.

मात्र, सरकारने २ जानेवारीपर्यंतची मुदत वाढ मागीतली आहे. कारण या महिन्यात दिवाळीच्या सुट्ट्या तसंच शनिवार आणि रविवार यामध्ये शासकीय कार्यलय बंद राहतील. सरकारने २४ तारीख समजूनच लवकर कामे करावीत या नंतर जर सरकारने दगा दिला तर आम्ही पूर्ण मराठ्यांसोबत उभे राहू. पूर्ण ताकदीने आंदोलनात उभे राहू, सरकारला घेरू, असा इशारा प्रहारचे आमदार बच्चू कडूं यांनी राज्य सरकारला दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in