
सीमा हैदर प्रकरण देशभर गाजत असताना आता याप्रकरणात मनसेने उडी मारली आहे. हा तमाशा बंद करा, असं मनसेकडून सांगण्यात आलं आहे. आमचं ऐकलं नाही तर राडा होणार, अशी ताकीद देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देण्यात आली आहे. सीमा हैदर नेपाळमार्गे अनधिकृतरित्या भारतात आली आहे. नुकतीच सीमाला 'कराची टू नोएडा' या चित्रपटाची ऑफर देण्यात आली. या प्रकरणावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सीमाच्या बॉलिवूड प्रवेशाला विरोध दर्शवला आहे.
सीमाला कोणत्याही निर्मात्याने आपल्या चित्रपटात काम दिल्यास कठोर कारवाई करण्याचा निशारा मनसेकडून देण्यात आला आहे. मनसेचे सरचिटणीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे. अमेय खोपकर म्हणाले की, देशद्रोही चित्रपट निर्मात्यांना लाज का वाटत नाही? हे असले तमाशे ताबडतोब बंद करा, असा जाहीर इशारा देतोय, असं खोपकर म्हणाले आहेत. मुंबईतील एका प्रोडक्शन हाऊसने सीमा हैदरला चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली आहे.
सीमा हैदरला अमित जानी यांनी त्यांच्या प्रोडक्शन हाऊस 'जानी फायरफॉक्स'मध्ये काम करण्याची ऑफर दिली आहे. जानी यांनी काही महिन्यापूर्वी मुंबईत कार्यालय सुरु केले आहे. सीमा हैदर व्यतिरिक्त तो उदयपूर टेलर कन्हैया लाल खून प्रकरणात 'ट्रेलर' नावाच सिनेमा बनवत आहे. सीमाला दिलेल्या ऑफरवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.